तंत्रज्ञान

Whatsapp वर मिळतोय 105 रुपयांचा कॅशबॅक ! कसा मिळेल 105 रुपयांचा कॅशबॅक जाणून घ्या अधिक

Whatsapp वर मिळतोय 105 रुपयांचा कॅशबॅक ! कसा मिळेल 105 रुपयांचा कॅशबॅक जाणून घ्या अधिक

Whatsapp cashback Rs.105 :- आता तर व्हॉट्सअ‍ॅपवरून पेमेंटचीही सोय उपलब्ध झाली आहे. व्हॉट्सअपचं हे पेमेंट फीचर यशस्वी करण्यासाठी आणि Google Pay, PhonePe आणि Paytm यांसारख्या पेमेंट अ‍ॅप्सशी स्पर्धा करण्यासाठी कंपनी सतत नवनवीन ऑफर्स आणत असते. व्हॉट्सअपनी पेमेंट फिचरच्या (WhatsApp Pay) माध्यमातून युझर्सना 105 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर सुरू केली आहे. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप पेद्वारे पैसे पाठवल्यास तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

ही कॅशबॅक तीन पेमेंटवर मिळेल.प्रत्येक पेमेंटवर 35 रुपयांची कॅशबॅक दिला जाईल. अशा प्रकारे तुम्ही तीन वेळा पेमेंट करून 105 रुपयांची कॅशबॅक (Cash Back) मिळवू शकता. या ऑफरची सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्ही किती रुपयांचं पेमेंट करावं, अशी कोणतीही अट नाही. तुम्ही अगदी एक रुपया पाठवूनही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

■ कॅशबॅक मिळवण्यासाठी खालील स्टेप्स पहा

1.सर्वांत आधी तुमच्या फोनवर WhatsApp ओपन करा. त्यात WhatsApp Payment वर जा.

2.तिथे तुम्हाला पेमेंट करण्याचा पर्याय मिळेल. पे या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुम्हाला ज्याला पैसे पाठवायचे आहेत तो कॉन्टॅक्ट निवडा.

3.आता तुम्हाला पाठवायची असलेली रक्कम टाका. खाली तुम्हाला पेमेंट नोटसाठी काही तरी लिहिण्याचा पर्याय दिसेल. तुम्हाला हवं असल्यास तिथे काही लिहा, नाही तर तुम्ही ते ब्लँक सोडू शकता.

4. यानंतर, नेक्स्टवर क्लिक करताच तुम्हाला UPI पिन टाकावा लागेल. पैसे ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला कॅशबॅक मिळेल.

■ तुम्ही नवीन युझर असलात, तर सर्वांत आधी WhatsApp पे वर जा आणि तुमचं बँक खातं UPI शी लिंक करा. त्यानंतर वर दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही पेमेंट करू शकता आणि कॅशबॅकचा लाभ मिळवू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close