राज्य

HSC SSC Results 2023: 10 वी/12 वी चा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर !

HSC SSC Results 2023: 10 वी/12 वी चा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर !

HSC SSC Results 2023: देशातील CBSE आणि ICSE बोर्डाचा (HSC SSC Results 2023) 10वी/12 वी चा निकाल जाहीर झाला आहे. आता उत्सुकता आहे महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या निकालाची.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 10वी/12 वी चा निकाल कधी लागणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमधून प्रतिक्षा होत आहे.

हाती आलेल्या अहवालानुसार इयत्ता 12वीचा निकाल 20 मे नंतर जाहीर होण्याची अपेक्षा आहे. तर 10वीचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल (HSC SSC Results 2023) जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डच्या mahahsscboard.in याअधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल तपासू शकतात.

यंदा 13 लाखांहून अधिक विद्यार्थी 12 वी च्या परीक्षेला बसले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावीचा निकाल अधिकृत संकेतस्थळ mahresults.nic.in वर जाहीर करणार आहे. तसेच https://www.mahahsscboard.in/ या लिंकवर वरुन विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात.

मागील ट्रेंडनुसार, वर्ष 2018 ते वर्ष 2022 पर्यंत जारी केलेले SSC निकाल (HSC SSC Results 2023) जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यात घोषित केले जात होते. मागील वर्षाचा ट्रेंड पाहता इयत्ता 12वीचा निकाल जून 2023 मध्ये देखील जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

मात्र याबाबत बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही तारीख किंवा वेळ निश्चित करण्यात आलेली नाही. सध्या इयत्ता 12वी आणि 10वीच्या प्रश्नपत्रिकांचे मूल्यांकन सुरू असून 50 टक्क्यांहून अधिक मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे.

इथे पहा निकाल – (HSC SSC Results 2023)

1. mahahsscboard.in

2. mahresult.nic.in

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा 👉 https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close