विशेष

Votar Id Photo Change मतदान कार्डवरील फोटो बदलवायचायं ? आजच घरबसल्या बदलून घ्या !

Votar Id Photo Change मतदान कार्डवरील फोटो बदलवायचायं ? आजच घरबसल्या बदलून घ्या !

तुम्हाला मतदान ओळखपत्रावरील फोटो आवडला नसेल तर तो सहज बदलता येतो. त्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत. या सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या मतदान ओळखपत्रावरील फोटो बदलवू शकता.

मतदान ओळखपत्रावरील बदला फोटो

मतदान ओळखपत्रात अनेकदा फोटो चांगला दिसत नाही. कॅमेऱ्याची लो क्वालिटी, फोटो छोट्या चौकटीत बसवताना तो कम्प्रेस करण्यात आल्याने तो ओळखपत्रावर अंधूक अथवा काळपट दिसतो. तो व्यवस्थित दिसत नाही. तुम्हाला हा फोटो घरबसल्या या सोप्या पद्धतीने बदलता येतो.

मतदान ओळखपत्रावरील फोटो बदलण्यासाठी खालील स्टेप्स पहा

1. सर्वात अगोदर नॅशनल वोटर्स सर्व्हिस पोर्टलवर https://www.nvsp.in/ जा
2.येथे Correction In Voter ID चा पर्याय मिळेल, यावर क्लिक करा
3.तुम्हाला वोटर मित्र चॅटबॉट पाठविण्यात येईल
तुमचा मतदान ओळखपत्र क्रमांक मागण्यात येईल. तो जमा करा.
4.तुमच्याकडे Voter ID Number नसेल तर वोटर आयडी क्रमांक नाही, यावर क्लिक करा
5.त्यानंतर इलेक्टोरल रोलचा तपशील द्यावा लागेल
तुमच्या मतदार संघातील मतदान ओळखपत्राची यादी समोर येईल. त्यात वोटर आयडी निवडा.
6.येथे तुम्हाला मतदान ओळखपत्रात बदल का करायचे याचे कारण नमूद करावे लागेल.
7.त्यानंतर योग्य ती माहिती भरून आधार क्रमांक नोंदवावा लागेल.
8.फोटो बदलण्यासाठी नवीन फोटो अपलोड करावा लागेल.
त्यानंतर Continue पर्यायावर क्लिक करा

सर्वात शेवटी एक रेफरेंस क्रमांक समोर येईल. तो जपून ठेवा.
हा क्रमांक तुम्हाला स्टेट्स चेक करण्यासाठी उपयोगी ठरेल.
त्यानंतर काही वेळातच तुमचा फोटो वोटर आयडीवर अपडेट होईल.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close