तंत्रज्ञान

Whatsapp Banking घरबसल्या व्हाट्सअँप वर होतील बँकेची कामे बँकेचे व्हाट्सअँप नंबर सेव करून घ्या

Whatsapp Banking घरबसल्या व्हाट्सअँप वर होतील बँकेची कामे बँकेचे व्हाट्सअँप नंबर सेव करून घ्या

Whatsapp Banking आजकाल बँकांनी देखील आपल्या ग्राहकांना घरबसल्या अनेक सेवा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन बँकिंगची सुविधा सुरु केली आहे. ही सुविधा आणखी सुलभ करण्यासाठी अनेक बँकांकडून WhatsApp बँकिंगही सुरू करण्यात आले आहे.

याद्वारे, ग्राहकांना शेवटचे 5 ट्रान्सझॅक्शन डिटेल्स, बॅलन्स इन्क्वायरी, स्टॉप चेक आणि खातेदारांसाठी चेक रिक्वेस्ट यासारख्या नॉन-फायनान्सिंग बँकिंग सर्व्हिसेसच्या सुविधेचा लाभ घेता येईल. जर आपल्यालाही याचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या बँकेचा WhatsApp नंबर फोनमध्ये सेव्ह करा. आज आपण PNB, HDFC, ICICI, SBI, बँक ऑफ बडोदा आणि एक्सिस बँके सारख्या सर्व प्रमुख बँकांच्या WhatsApp बँकिंग सुविधेविषयी माहिती जाणार घेणार आहोत.

PNB Whatsapp Banking Number :

3 ऑक्टोबर रोजीच PNB कडून सांगण्यात आले की, त्यांनी कस्टमर आणि नॉन- कस्टमर्ससाठी WhatsApp द्वारे बँकिंग सेवा लाँच केली आहे. एक निवेदन देत बँकेने म्हटले की, WhatsApp वर बँकिंग सुविधा ऍक्टिव्ह करण्यासाठी ग्राहकांना PNB चा अधिकृत WhatsApp नंबर 919264092640 सेव्ह करावा लागेल. तसेच या नंबरवर हाय/हॅलो पाठवून संभाषण सुरू करावे लागेल.

ICICI Bank Whatsapp Banking Number :

ICICI बँकेच्या ग्राहकांना WhatsApp बँकिंग सुविधेचा लाभ घेण्यासाठी 8640086400 हा नंबर सेव्ह करावा लागेल. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून 8640086400 या क्रमांकावर ‘Hi’ पाठवावे लागेल. तसेच WhatsApp मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे मोबाइल स्क्रीनवर सुरक्षित आणि इंटरेक्टिव्ह मेन्यू द्वारे संभाषण सुरू करण्यासाठी 9542000030 वर मिस्ड कॉल किंवा एसएमएस देखील करता येऊ शकेल.

HDFC Bank Whatsapp Banking Number :

व्हॉट्सऍप बँकिंग बाबत आपल्या वेबसाइटवर माहिती देताना HDFC बँकेने म्हंटले की, आता आपल्याला फक्त मोबाईलमध्ये 70700 22222 नंबर सेव्ह करावा लागेल. त्यानंतर व्हॉट्सऍपवर ‘Hi’ असे टाइप करून ते पाठवावे लागेल. व्हॉट्सऍपवर HDFC बँक चॅट बँकिंगद्वारे 90 हून जास्त ट्रान्सझॅक्शन आणि सेवा उपलब्ध आहेत.

Axis Bank Whatsapp Banking Number :

एक्सिस बँकेच्या ग्राहकांना WhatsApp सेवांचा लाभ घेण्यासाठी 7036165000 वर ‘Hi’ असे टाइप करून पाठवावे लागेल. सदस्यता घेतल्यानंतर खाती/चेक, क्रेडिट कार्ड, FD आणि लोन यांसारख्या सेवांचा लाभ घेता येईल.

◆ SBI Whatsapp Banking Number :

SBI कडूनही अलीकडेच ग्राहकांसाठी WhatsApp बँकिंग सेवा सुरू करण्यात आली आहे. SBI WhatsApp बँकिंग सेवेद्वारे बँक खाते ऍक्टिव्ह करण्यासाठी, रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून WAREG A/C क्रमांक 917208933148 वर एसएमएस पाठवा. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर SBI ची WhatsApp सेवा वापरता येऊ शकेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.onlinesbi.sbi/

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close