विशेष

Satbara App : घरबसल्या 7/12 उतारा, 1 मिनिटांत काढा, ते सुद्धा अगदी मोफत

Satbara App : घरबसल्या 7/12 उतारा, 1 मिनिटांत काढा, ते सुद्धा अगदी मोफत

Satbara App ; शेतकरी मित्रांनो, शेती करत (Satbara App) असताना जमिनीचा सातबारा उतारा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. शेतीशी निगडित कोणत्याही सुविधेचा फायदा घ्यायचा असेल तर सर्वात आधी सातबारा उतारा मागितला जातो.

त्यातच तलाठी कार्यालयातून सातबारा उतारा काढायचा म्हंटला तर अनेक चकरा माराव्या लागतात आणि आपला वेळही जातो. मात्र आता तुम्हाला तुमच्या मोबाईल वर घरबसल्या सातबारा उतारा काढता येणार आहे. विशेष म्हणजे अगदी काही मिनिटात आणि 1 रुपया सुद्धा खर्च न करता तुम्हाला हि सेवा मिळत आहे.

होय, हॅलो कृषी (Satbara App) हे मोबाईल अँप तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून तुम्ही घरबसल्या सातबारा उतारा, 8 अ उतारा काढू शकता.

सातबारा मिळवण्यासाठीच्या सोप्या स्टेप्स खालीलप्रमाणे – (Satbara App)

1) सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं सर्च करुन ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा. Link : https://bit.ly/HelloKrushiApp

2) हॅलो कृषी अँप Install केल्यानंतर सर्वप्रथम तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि शेतीविषयक आवश्यक माहिती भरा.

3) आता Hello Krushi ऍप ओपन करुन होम पेज वरील ‘सातबारा व भूनकाशा’ हा विभाग निवडा.

4) त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये पुन्हा 6 विभाग मिळतील सातबारा, डिजिटल सातबारा, भू-नकाशा, ई -चावडी, भूमी अभिलेख, जागेचे बाजारमूल्य. इ. यापैकी सातबारा विभागावर क्लिक करा.

5) त्यानंतर आपला विभाग निवडा ( उदा कोकण, पुणे.. )

6) त्यानंतर जिल्हा निवडा (उदा. सिंधुदुर्ग, नागपूर, सातारा.. ) (Satbara App)

7)आता तालुका निवडा (उदा. कराड, कुडाळ, उमरेड..)

8)गाव निवडा (उदा. काले, वर्दे. )

9) आता तुम्हाला एक पान दिसेल ज्यात ‘७/१२’ हा पर्याय निवडा.

10) गट नंबर हा पर्याय निवडा , ‘शोधा’ या बटन वर क्लिक करा.(येथे तुम्ही केवळ आडनाव, पहिले नाव,मधले नाव ,सर्वे नम्बर /गट नंबर टाकून सुद्धा उतारा शोधु शकता)

11) आता तुम्हाला गटामधील इतर नंबर दिसतील. यातील तुमचा नंबर निवडा.

12) आता e captcha चा पर्याय दिसेल. परंतु तुम्हाला हा e captcha भरण्याची आवश्यकता नाही. कारण हॅलो कृषी अप स्वतःच तुमचा captcha भरेल.

13) त्यानंतर तुमचा सातबारा दिसेल, ‘डाउनलोड करा’ या बटन वर क्लिक करून उतारा डाउनलोड करून घ्या. त्याची प्रिंट काढून घ्या. Link : https://bit.ly/HelloKrushiApp

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close