विशेष

फक्त ७ दिवसांत थेट घरीच मिळवा ड्रायव्हिंग लायसन ! RTO मध्ये जाण्याची गरज नाही ! असा करा ऑनलाइन अर्ज

फक्त ७ दिवसांत थेट घरीच मिळवा ड्रायव्हिंग लायसन ! RTO मध्ये जाण्याची गरज नाही ! असा करा ऑनलाइन अर्ज

◆ भारतात वाहन चालवण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवल्यास MV-Act अंतर्गत तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

◆ तसेच, जर तुम्ही लायसन्सशिवाय गाडी चालवताना पकडले गेलात तर तुम्हाला मोठा दंडही भरावा लागू शकतो.आज आम्ही तुम्हाला अशा लायसन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यासाठी तुम्हाला आरटीओमध्ये (Driving Licence) जाण्याचीही गरज नाही.

◆ सध्याच्या नियमांनुसार, १६ ते १८ वर्षांपर्यंतच्या व्यक्तिंना लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते. परंतु, हा परवाना असलेली व्यक्ति फक्त Without Gear ची गाडी चालवू शकते. तसेच हे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी पालकांचीही परवानगी असणे आवश्यक आहे. या लायसन्सचे वैशिष्ट्य म्हणजे ते तुम्ही घरबसल्याही काढू शकता, यासाठी तुम्हाला फक्त एक चाचणी द्यावी लागेल.

◆ ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी पास करण्याबरोबरच आरटीओ परवाना जारी करते. हा ड्रायव्हिंग लायसन्सचा परवान्यासाठी अर्ज करताना तुमच्याकडे राहण्याचा पुरावा, वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे. १८ वर्षांवरील व्यक्ती हा परवाना घेऊ शकत नाहीत. यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट पास केल्यानंतर आरटीओकडून ड्रायव्हिंग लायसन्स मिळवावे लागेल. भारत सरकारच्या कलम 4 अंतर्गत प्रत्येक भारतीयाला शिकाऊ परवाना ठेवण्याची परवानगी देते.

Driving Licence: साठी असा करा अर्ज

1.जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करायचा असेल तर, प्रथम भारताच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do या वेबसाइटवर जा.
2.यानंतर समोर एक बॉक्स येईल, त्यामध्ये तुमचे राज्य सिलेक्ट करा.
3.यामध्ये तुम्हाला विविध पर्याय दिसतील त्यामधील Apply for Learner Licence यावर क्लिक करा.
4.तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे याठीकाणी अपलोड करावी लागतील.
5.यानंतर तुम्हाला एक ऑनलाइन चाचणी पास करावी लागेल.
6. 7 दिवसांच्या आत तुम्हाल ड्रायव्हिंग लायसन्स असेल.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close