तंत्रज्ञान

Aadhar Voter ID linking मतदान कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करा ! घरबसल्या मोबाईल करू शकता हे काम

Aadhar Voter ID linking मतदान कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करा ! घरबसल्या मोबाईल करू शकता हे काम

◆ Aadhaar Voter ID linking : देशभरातील संपूर्ण राज्यांमध्ये आता आधार कार्डला मतदान ओळखपत्र लिंक करण्यास सुरूवात झाली आहे. मतदारांची ओळख पटवण्यासाठी आणि मतदार यादीतील डुप्लिकेशन टाळण्यासाठी मतदार ओळखपत्र आधारशी जोडले जात आहे.

◆ आधार कार्डला मतदान ओळखपत्र लिंक करण्यासाठी मतदान कार्ड, आधार कार्ड आणि मोबाईल नंबरची आवश्यकता आहे. ही कागदपत्रे असल्यानंतर voter Helpline app द्वारे आधार नंबर आणि मोबाईल नंबर आपल्या स्वतःच्या मोबाईल वरून ऑनलाईन करता येत आहे. राज्यातील प्रत्येक मतदान केंद्र आणि मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात देखील तुमचे मतदान ओळखपत्र आधार कार्डसोबत लिंक करून देण्यात येईल.

◆ घरबसल्याही करता येईल आधारला मतदान ओळखपत्र लिंक

1. सर्वप्रथम मतदार हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा. हे Android आणि iOS दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

2. यानंतर इलेक्टोरल ऑथेंटिकेशन फॉर्म (फॉर्म 6बी) वर क्लिक करा आणि ते उघडा. त्यानंतर Let’s Start वर क्लिक करा.

3. तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका. हा क्रमांक आधार कार्डशी जोडलेला असणे आवश्यक आहे. नंबर टाकल्यानंतर त्यावर ओटीपी येईल.

4. तुम्हाला प्राप्त झालेला OTP एंटर करा आणि नंतर Verify वर क्लिक करा. त्यानंतर Yes I Have Voter ID वर क्लिक करून Next वर क्लिक करा.

5. यानंतर तुमचा मतदार आयडी क्रमांक (EPIC) टाका. तुमचे राज्य निवडा आणि Fetch details वर क्लिक करा. त्यानंतर Proceed वर क्लिक करून पुढे जा.

6. नंतर तुमचा आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक,ऑथेंटिकेशनच्या ठिकाणी टाका आणि Done वर क्लिक करा.

7. शेवटी तुमच्या फॉर्म 6-B चे रिव्हीव हे पेज उघडेल. त्यात तुमची सर्व माहिती तपासल्यानंतर Confirm वर क्लिक करा. तुमचे आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र लिंक झाले असेल.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close