व्यवसाय

Business Idea; रेल्वेसोबत मिळून सुरु करा हा बिझनेस, कधीच कमी होणार नाही ग्राहकांच्या रांगा

Business Idea; रेल्वेसोबत मिळून सुरु करा हा बिझनेस, कधीच कमी होणार नाही ग्राहकांच्या रांगा

Business Idea; तुम्हाला रेल्वेसोबत मिळून बिझनेस सुरु करायचा असेल तर एक शानदार आयडिया आपण आज जाणून घेणार आहोत. रेल्वे स्टेशनवरील दुकाने तुम्ही पाहिली असतीलच.

तुम्ही तुमच्या जवळच्या रेल्वे स्टेशनवरही असेच दुकान उघडू शकता. रेल्वे स्टेशन असल्यामुळे येथे चोवीस तास लोकांची वर्दळ असते. त्यामुळे तुमच्या दुकानात ग्राहकांची कधीच कमतरता भासणार नाही. कोणत्याही रेल्वे स्टेशनवर दुकान उघडण्यासाठी तुम्हाला रेल्वे टेंडर घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तुम्ही रेल्वे टेंडर कसे मिळवू शकता आणि रेल्वे स्टेशनवर तुमचे दुकान कसे उघडू शकता हे पाहूया.

◆  काय असते प्रोसेस ?

रेल्वे स्टेशनवर दुकान उघडण्यासाठी, तुम्हाला कोणत्या प्रकारचे दुकान उघडायचे आहे हे आधी ठरवावे लागेल. यानंतर, IRCTC वेबसाइटला (IRCTC) भेट देऊन, कोणत्या प्रकारचे दुकान उघडायचे याची पात्रता चेक करावी लागेल. तुम्ही रेल्वे स्टेशनवर बुक स्टॉल, चहा स्टॉल, फूड स्टॉल, न्यूज पेपर स्टॉल किंवा इतर कोणत्याही प्रकारचे दुकान उघडू शकता.

या कागदपत्रांची असेल आवश्यकता

रेल्वे स्टेशनवर दुकान उघडण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल. ज्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वोटर आयडी कार्ड, बँक डिटेल्सचा समावेश आहे. स्टेशनवर उघडणाऱ्या दुकानांसाठी रेल्वे शुल्क आकारते. हे तुमच्या दुकानाचा आकार आणि स्थान यावर अवलंबून असते. यामध्ये तुम्हाला 40 हजार ते 3 लाख रुपयांपर्यंत फी भरावी लागेल.

टेंडर कसं घ्यायचं?

स्टेशनवर दुकान उघडण्यासाठी रेल्वेच्या टेंडरची माहिती घ्यावी लागते. IRCTC वेबसाइटला भेट देऊन, तुम्ही ज्या स्टेशनवर दुकान उघडू इच्छिता त्या स्टेशनसाठी रेल्वेने टेंडर काढले आहे की नाही हे तपासा. टेंडर निघाले तर तुम्हाला रेल्वेच्या झोनल ऑफिस किंवा डीआरएस ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरून सबमिट करावा लागेल. येथे रेल्वे तुम्ही फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीची व्हेरिफाय करते. त्यानंतर तुम्हाला टेंडर जारी केलं जाते.

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा 👉 https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close