तंत्रज्ञान

भारीच की फक्त चेहरा दाखवून आधार कार्ड करा डाउनलोड !(UIDAI) ने लाँच केले FaceRD App जाणून घ्या अधिक

भारीच की फक्त चेहरा दाखवून आधार कार्ड करा डाउनलोड !(UIDAI) ने लाँच केले FaceRD App जाणून घ्या अधिक

FaceRD App आधार कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही फेस ऑथेंटिकेशनद्वारेही तुमची ओळख कन्फर्म करू शकता. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने FaceRD App नावाचे ऍप लाँच केले आहे.

◆ हे ऍप गुगल प्ले स्टोअरवरून सहज डाउनलोड करता येते. UIDAI ने ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे.

◆ माहितीनुसार, हा ऍप यूजरचा चेहरा कॅप्चर करण्यासाठी फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर करतो. जीवन प्रमाण, रेशन वितरण (PDS), कोविन लसीकरण ऍप, शिष्यवृत्ती योजना, शेतकरी कल्याण योजना यासारख्या आधारशी संबंधित विविध अनुप्रयोगांसाठी चेहरा प्रमाणीकरण म्हणजेच फेस ऑथेंटिकेशन वापरले जाऊ शकते.

◆ फेस ऑथेंटिकेशन फीचर OTP शिवाय काम करतो. हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही, तर तुम्ही घरबसल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरून आधार कार्ड डाउनलोड करू शकता.

◆ FaceRD अँप वरून असे डाउनलोड करा आधार कार्ड

1.Android डिव्हाइस वापरकर्त्यांनी त्यांच्या स्मार्टफोनवर Google Play Store ऍप ओपन करा आणि Aadhar FaceRD ऍप सर्च करा.

2.एकदा स्क्रीनवर ऍप दिसल्यानंतर, ‘इंस्टॉल’ वर क्लिक करा आणि नंतर ऍप ओपन करा.

3.फेस ऑथेंटिकेशन करण्यासाठी, ऑन-स्क्रीन गाईड फॉलो करा आणि ‘Proceed’ वर टॅप करा.

4.उत्तम फेस ऑथेंटिकेशनसाठी, तुम्हाला कॅमेऱ्याच्या जवळ जावे लागेल आणि वापरण्यापूर्वी कॅमेरा लेन्स स्वच्छ करावी लागेल.

5.यानंतर, ऍपद्वारे, तुम्हाला चेहरा कॅप्चर करून तुमचे आधार कार्ड डाउनलोड करता येईल.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close