आरोग्य

उन्हाळ्यात ताक पिल्याने शरीराला होतील अनेक फायदे ! हे आहेत 4 महत्वाचे फायदे

उन्हाळ्यात ताक पिल्याने शरीराला होतील अनेक फायदे ! हे आहेत 4 महत्वाचे फायदे

Lokmajha Health Update:- उन्हाळ्यात (Summer) शरीराचे तापमान (Body temperature) सतत वाढत असते, अशा वेळी तुम्ही थंड पदार्थ खाऊन किंवा पिऊन शरीराला आराम देत असता. मात्र उन्हाळ्यात शरीराला ताक पिल्याने देखील खूप फायदे (Advantages) मिळतात.

ताक उष्णतेपासून तुमचे संरक्षण तर करतेच, पण अन्न पचण्यासही मदत करते. हे पोटावर खूप हलके आहे. तज्ञांच्या मते (According to experts), जर तुम्ही उन्हाळ्यात नियमितपणे ताक प्यायले तर अनेक आजार तुमच्यापासून दूर राहतील.

◆ ताक पिण्याचे फायदे जबरदस्त फायदे

1- आयुर्वेदानुसार ताक प्यायल्याने आरोग्य चांगले राहते आणि अनेक आजार दूर होतात.

2- ताक पोटासाठी हलके आहे

3- ताक पचण्यास सोपे असते, तसेच ते पचन सुधारण्याचे काम करते.

4- उन्हाळ्यात, लोकांना पोट फुगणे, पचनाच्या समस्या, गॅस्ट्रो, भूक न लागणे यासारख्या पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागतो, ज्यावर ताकाचे नियमित सेवन केल्याने मात करता येते.

◆ उन्हाळ्यात ताक कसे बनवायचे ?

1.1/4 कप दही घ्या आणि त्यात एक कप पाणी घाला.

2.त्यात चवीनुसार मीठ घालावे. नंतर त्यात अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घाला.

3.हँड ब्लेंडर किंवा मिक्सरच्या मदतीने ते मिक्स करावे.

4.एका ग्लासमध्ये काढून त्यावर कोथिंबीर, पुदिन्याची पाने किंवा कढीपत्त्याने सजवा.

5.दिवसभराचे जेवण झाल्यावर ताक प्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close