तंत्रज्ञान

भारीच गुपचूप पाहू शकता दुसऱ्याच Whatsapp स्टेटस Seen मध्ये दिसणार नाही तुमचं नाव

भारीच गुपचूप पाहू शकता दुसऱ्याच Whatsapp स्टेटस Seen मध्ये दिसणार नाही तुमचं नाव

व्हॉट्सअ‍ॅपवर अनेकदा आपण एखादा फोटो, व्हिडीओ किंवा मेसेज हे स्टेटसला ठेवत असतो. अनेकदा इतरांनी ठेवलेले व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस हे आपल्या प्रचंड आवडतात. स्टेटस हे 24 तासांनंतर निघून जातात. आपलं स्टेटस कोणीकोणी पाहिलं हे देखील समजतं. काही वेळा एखाद्याचं स्टेटस आपल्याला पाहायची इच्छा असते पण ते समोरच्या व्यक्तीला समजू नये असं देखील वाटतं असतं.

एखाद्याचं स्टेटस गुपचूप पाहायची इच्छा असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. समोरील युजरला तुम्ही स्टेट्स पाहिलं की नाही, हे समजणार नाही. नेमकं कसं ते जाणून घेऊया…

1– सर्वप्रथम WhatsApp ओपन करा.

2- होम स्क्रीनवरील डाव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.

3- सेटिंग्सवर टॅप करा. सेटिंग्समध्ये अकाऊंट पर्यायावर क्लिक करा.

4- त्यानंतर आता प्रायव्हसी पर्यायावर क्लिक करा.

5- यामध्ये Read Receipt फीचर डिसेबल करा.

◆ रीड रिसिप्ट फीचर बंद केल्यानंतर तुम्ही WhatsApp स्टेटस पाहिले की नाही हे समजणार नाही. मात्र, तुमचं स्टेट्स देखील कोणी पाहिलं हे देखील तुम्हाला समजणार नाही. इतर माध्यमातून देखील तुम्ही लपून-छपून स्टेट्स पाहू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close