तंत्रज्ञान

Online Payment करताना चुकूनही करू नका हे काम ! झटक्यात रिकाम होईल बँक अकाउंट

Online Payment करताना चुकूनही करू नका हे काम ! झटक्यात रिकाम होईल बँक अकाउंट जाणून घ्या अधिक

आजच्या इंटरनेटच्या जगात अनेक काम ऑनलाइन (Online) होतात. यात ऑनलाइन पेमेंटही (Online Payment) मोठ्या प्रमाणात केलं जातं.

यूपीआय पेमेंट्स (UPI Payments) कुठेही पैसे पाठवण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठीचा सर्वात सोपा पर्याय आहे. पण UPI Payment करताना याचा अतिशय सावधपणे वापर करणं गरजेचं आहे. अन्यथा एक चूक तुमचं मोठं नुकसान करू शकते.

1.UPI पेमेंट करताना तुम्ही कोणाला पैसे पाठवता याची खात्री करा. मेल किंवा फोन नंबरवरुन पैसे पाठवताना आधी त्याची माहिती घ्या. अनेकदा मेल्समध्ये आलेले फोन नंबर्स तुमचे डिटेल्स चोरी करण्याचा एक मार्ग असतो. पैसे रिसीव्ह करण्यासाठी कोणी तुमचा UPI PIN विचारत असेल, तर तो सांगू नका.

2.पैसे रिसीव्ह करण्यासाठी बँक कधीही UPI PIN टाकण्यासाठी सांगत नाही. केवळ पैसे पाठवताना पीन टाकावा लागतो. अनेकदा क्यूआर कोडद्वारे (QR Code) पैसे पाठवतानाही मोठे फ्रॉड होतात. फ्रॉडस्टर्स युजरला ओळखीच्या नावाने किंवा इतर कोणत्याही कारणाने पैसे पाठवायचे असल्याचं सांगतात.

3.त्यासाठी युजरला QR Code पाठवतात आणि तो स्कॅन करण्यासाठी सांगतात. युजरने हा कोड स्कॅन केला तर अकाउंटमधून पैसे चोरी होण्याचा मोठा धोका असतो.

◆ तसंच कधीही पेमेंट करण्यासाठी कोणतंही App वापरु नका. अधिकृत App वापरणं गरजेचं आहे.

◆अनेक जणांकडून फेक अँप डाउनलोड केले जातात. अशा Apps द्वारे तुमची पर्सनल माहिती, डेटा शेअर केला जातो. यामुळे बँक अकाउंट धोक्यात येतं. सिटी बँकेने (Citi Bank) एका अँडव्हायजरीमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

◆ युजर्स Modi BHIM, BHIM Modi App, भीम पेमेंट-यूपीआय गाइड, भीम बँकिंग गाइड असा App पासून सावध राहावं. अनेकदा फेक App खऱ्या App प्रमाणेच वाटतात. त्यामुळे अनेकांकडून ते डाउनलोड केले जातात. परंतु कोणतंही App डाउनलोड करताना ते खरं आहे की नाही हे तपासणं फायद्याचं ठरतं.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close