आरोग्य

Johnson’s Baby Powder तुमच्या लहान मुलांना तर नाही लावत ना ही पावडर ! कंपनीचा परवाना झालाय रद्द

Johnson’s Baby Powder तुमच्या लहान मुलांना तर नाही लावत ना ही पावडर ! कंपनीचा परवाना झालाय रद्द

जॉनसन बेबी पावडर(Johnson’s Baby Powder) ही अनेक आईंनी विश्वासांनी वापरलेली पावडर आहे. त्यांच्या तान्हुल्याला (Baby) ही पावडर त्यांनी मायेने लावली आहे.

पण आता ही पावडर वापरताना सावध रहा. कारणही तसेच घडले आहे.

महाराष्ट्र सरकारच्या अन्न आणि औषधी प्रशासन विभागाने (FDA) जॉनसन बेबी पावडर कंपनीला दणका दिला आहे. ही बेबी पावडर मानकांवर खरी न उतरल्याने कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

कंपनी आता महाराष्ट्रात टॅल्क बेस्ड बेबी पावडरचे उत्पादन आणि विक्री करु शकणार नाही. पावडरचे सॅम्पल स्टँडर्ड क्वालिटीच्या कसोटीवर टिकले नाहीत.

या कंपनीने मुंबई, मुलुंड, पुणे आणि नाशिक येथून उत्पादित मालाचे सॅम्पल FDA कडे पाठवले होते. पण सुरक्षा मानके आणि दर्जाच्या चाचणीत ही पावडर फेल झाली. त्यानंतर कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला.

एफडीएने एक प्रेस नोट प्रसिद्धीला दिली आहे. त्यानुसार, नवजात शिशुंच्या त्वचेसाठी ही पावडर हानीकारक आहे. FDA ने कंपनीला बाजारातील माल परत बोलवण्याचे निर्देश दिले आहेत.

ड्रग आणि अँडमिनिस्ट्रेशन अँक्ट 1940 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. यामध्ये कंपनीला उत्पादनातील दोषांबाबत नोटीस बजावण्यात आली. तसेच तिचा परवाना रद्द का करण्यात येऊ नये याची विचारणा करण्यात आली आहे.

कंपनीने याप्रकरणी उत्तर दाखल केले आहे. जगभरातील आरोग्य तज्ज्ञांच्या वैज्ञानिक आधारावर कंपनीची पावडर खरी उतरल्याचे जॉनसन अँड जॉनसनने स्पष्ट केले आहे.

टॅल्क आधारीत जॉनसन कंपनीची बेबी पावडर सुरक्षा आणि दर्जा लक्षात घेऊन तयार करण्यात येते. या कंपनीत कोणतेही हानीकारक तत्व नसल्याचा दावा कंपनीने केला आहे.

जॉनसन अँड जॉनसनने या पावडरमुळे कॅन्सरसारखा असाध्य आजार जडत असल्याचे आरोपही फेटाळून लावले आहे. या पावडरमुळे कुठलाही कँसर होत नसल्याचा दावा कंपनीने केला आहे.

अमेरिकन फार्मा कंपनी जॉनसन अँड जॉनसन अनेक दिवसांपासून भारतात त्यांच्या पावडरची विक्री करत आहे. भारतात या पावडरला मोठी मागणी आहे. यासोबतच बेबी शॅम्पू, सोप आणि ऑयलची पण कंपनी विक्री करते.

FDA च्या दाव्यानुसार, कंपनीचे पावडर मानकांच्या कसोटीवर खरे उतरले नाही. यातील पीएच मूल्य मानकांनुसार नव्हते. ही कारवाई कोलकत्यातील केंद्रीय औषधी प्रयोगशाळेच्या निर्णायक अहवालानंतर करण्यात आली आहे.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close