तंत्रज्ञान

मोबाईल सारखा गरम होतोय का ? मग या ट्रिक वापरून करा सुपरकूल जाणून घ्या अधिक

मोबाईल सारखा गरम होतोय का ? मग या ट्रिक वापरून करा सुपरकूल जाणून घ्या अधिक

◆ गेल्या काही वर्षांत स्मार्टफोन (Smartphones) चा वापर खूप वाढला आहे. परंतु अनेक वापरकर्ते फोन गरम झाल्याची तक्रार देखील करतात. उन्हाळ्यात हा त्रास जास्त वाढतो. ही समस्या अगदी सहजपणे दूर केली जाऊ शकते.

◆ जर तुमचा फोन काही मिनिटांच्या वापरात खूप गरम होत असेल, तर तुम्हाला काही पद्धती अवलंबल्या पाहिजेत ज्याद्वारे तुम्ही तो सामान्य ठेवू शकता. तसेच इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) उपकरणाचे थोडेसे गरम होणे सामान्य मानले जाते. परंतु जास्त गरम झाल्यास, तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील.

1.ब्राइटनेसवर लक्ष ठेवा
फोनचे तापमान कमी ठेवण्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमच्या स्क्रीनची ब्राइटनेस (Brightness) ऑप्टिमाइझ करावी लागेल. आजकाल बरेच स्मार्टफोन अधिक ब्राइटनेस सपोर्टसह येतात. गरज नसताना तुम्हाला ते कमी ठेवावे लागेल कारण ते फोन गरम करते आणि बॅटरी लवकर संपवते.

2.अत्यावश्यक नसलेले अँप्स बंद करा किंवा अनइंस्टॉल करा –
फोनमध्ये खूप अँप्स असतील तर तुमचा फोन गरम होऊ शकतो कारण अनेक अँप बॅकग्राउंडमध्ये काम करत राहतात आणि त्यामुळे प्रोसेसर (Processor) वापरला जातो. यामुळे फोनचे बॅकग्राउंड अँप्स साफ करत राहा आणि अनावश्यक अँप्स फोनमधून हटवा.

3.गेमिंग कमी करा –
आजकाल बरेच लोक गेम (Games) खेळण्यासाठी फोनचा वापर करतात. मिड-रेंज आणि लो-बजेट स्मार्टफोनमध्ये हेवी गेम्स खेळल्याने फोन गरम होतो. हे टाळण्यासाठी तासन्तास जड गेम खेळणे टाळावे. याशिवाय थेट सूर्यप्रकाशात फोन वापरणे टाळा.

4.चार्जिंग करताना काळजी घ्या
फोन चुकीच्या पद्धतीने चार्ज केला तरी तो गरम होतो. जर तुमचा फोन चार्जिंग (Charging) करताना खूप गरम होत असेल तर तुम्हाला उच्च दर्जाचे चार्जर वापरावे लागेल. याशिवाय तुमचा फोन लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपडेट नसेल तर तो अपडेट करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close