तंत्रज्ञान

तुमचा मोबाईल हरवला ! तर या tricks वापरून सहज मिळवू शकतात परत जाणून घ्या अधिक

तुमचा मोबाईल हरवला ! तर या tricks वापरून सहज मिळवू शकतात परत जाणून घ्या अधिक

◆आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाकडे स्मार्टफोन (Smart phone) असणं ही चैनीची नव्हे, तर गरजेची वस्तू झाली आहे. बहुतांश कामांसाठी आपण स्मार्टफोनवर अवलंबून राहू लागलो आहोत.

◆ स्मार्टफोन हरवला (Smartphone lost) किंवा चोरी झाला तर आपल्या घरातल्या सदस्याचा नंबरसुद्धा ठाऊक नसतो, अशी वेळ अनेकांवर येऊ शकते. त्यामुळेच माणसांची अनेकदा फजिती होते. फोन हरवला तर तो शोधण्यासाठी काही ट्रिक्स (Tricks) वापरल्या जाऊ शकतात.

◆ तुम्ही अँड्रॉइड युझर असाल तर

1.सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग मध्ये जाऊन Find My Device ऑन करून घ्या

2.जर तुमचा मोबाईल हरवला तर कुठल्याही मोबाईल वरून crome browser मध्ये सर्च करा https://www.google.com/android/find?u=0 वर साइन इन करून तुमच्या फोनचा माग घेऊ शकता.

3.अँड्रॉइड डिव्हाइसची लोकेशन ट्रॅकिंग सर्व्हिस योग्य रीतीने काम करायला हवी असेल, तर तुमच्या फोनचं जीपीएस फीचर ऑन असायला हवं. अन्यथा हे फीचर कोणत्याच कामाचं नाही.

4.असं केल्यानंतर तुम्हाला ‘लॉस्ट फोन’चा पर्याय दिसेल. त्या पर्यायाच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन सोप्या पद्धतीनं ट्रॅक करू शकता आणि त्यामधला डेटाही डिलिट करू शकता.

◆ तुम्ही आयफोन (iPhone) युझर असाल तर

1. तर सर्वप्रथम तुम्ही दुसऱ्या डिव्हाइसवरून आपल्या अ‍ॅपल आयडीवर लॉग-इन करून ‘लॉस्ट मोड’ अ‍ॅक्टिव्हेट करा.

2.तुम्ही अ‍ॅपलच्या फाइन्ड माय आयफोन (iPhone) या फीचरचाही वापर करू शकता. फाइन्ड माय नेटवर्कच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन स्विच ऑफ झाल्यानंतर 24 तासांनंतरही ट्रॅक करू शकता.

3. तुमच्याकडे दुसरं अ‍ॅपल डिव्हाइस नसेल, तर तुम्ही आयक्लाउड डॉट कॉम (icloud.com) या वेबसाइटवर जाऊन या फीचर प्रयोग करू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close