तंत्रज्ञान

आता Whatsapp वरही रेकॉर्ड करु शकता कॉल ! जाणून घ्या सविस्तर

आता Whatsapp वरही रेकॉर्ड करु शकता कॉल ! जाणून घ्या सविस्तर

■ कॉल रेकॉर्डिंग अ‍ॅप्स वर बंदी घालण्यात आली होती. यामुळे स्मार्टफोन युजर खूपच त्रस्त झाले होते. युजर्स नॉर्मल फोन कॉल्सला रेकॉर्ड करू शकत होते.

परंतु, व्हॉट्सअ‍ॅप कॉल्सला रेकॉर्ड करणे खूपच अवघड झाले होते. सध्या चॅटिंग आणि कॉलिंगसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा खूप जास्त वापर केला जातो. आता व्हॉट्सअ‍ॅपवर काही कॉल्स महत्त्वाचे सुद्धा असू शकतात. ज्याला रेकॉर्ड करण्याची गरज असते. व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला कॉल कसा रेकॉर्ड करू शकता याबाबत जाणून घेऊया…

■ या पद्धतीने WhatsApp वर कॉल रेकॉर्डिंग करा

व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल रेकॉर्ड करण्यासाठी कोणतीही अधिकृत पद्धत नाही किंवा फीचर उपलब्ध नाही. या चॅटिंग प्लॅटफॉर्मवर कॉल्सला रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला एका थर्ड पार्टी अ‍ॅपची मदत घ्यावी लागेल. व्हॉट्सअ‍ॅप कॉलला रेकॉर्ड करण्यासाठी अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत परंतु, आम्ही तुम्हाला Call Recorder Cube ACR संबंधी माहिती देत आहोत. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही सहज कॉल्सला रेकॉर्ड करू शकता.

व्हाट्सअप्प कॉल रेकॉर्ड करण्यासाठी खालील स्टेप्स पहा

1- सर्वात आधी Call Recorder Cube ACR हे गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करा.

2- ज्यावेळी अ‍ॅप तुम्ही स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल कराल तेव्हा फोनच्या सेटिंग्समध्ये जावून अ‍ॅक्सेसेबिलिटी ऑप्शनमध्ये या अ‍ॅपच्या अ‍ॅप कनेक्टरला एनेबल करा.

3- आवश्यक परमिशन दिल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप कॉल्सच्या ऑप्शनला ऑन करावे लागेल.

4- सहज तुम्ही आपला व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करू शकता. तसेच तुम्ही ऑटो रेकॉर्डिंग किंवा मॅन्युअल पद्धतीने सुद्धा कॉल्स रेकॉर्ड करू शकता.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close