तंत्रज्ञान

तुमच्या पॅन कार्डवर कोणी loan तर नाही घेतलं ना ! घरबसल्या असे करा चेक

तुमच्या पॅन कार्डवर कोणी loan तर नाही घेतलं ना ! घरबसल्या असे करा चेक

सध्या फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. पॅनसंबंधी असचं एक फ्रॉडचं प्रकरण नुकतंच समोर आलं. काही लोकांच्या पॅन कार्डवर एका App द्वारे लोन घेण्यात आलं. याबाबत त्यांना कोणतीही माहिती नव्हती. ज्यावेळी त्यांनी आपला क्रेडिट स्कोर पाहिला त्यावेळी त्यांना पॅन कार्डवर लोन घेतलं गेल्याचं समजलं. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, फिनटेक कंपनी इंडियाबुल्सच्या (Indiabulls) धनी अँपद्वारे (Dhani App) लोन घेण्यात आलं होतं.

त्यामुळे पॅन कार्डची वेळोवेळी माहिती घेत राहणं अत्यावश्यक आहे. अनेक जणांनी सोशल मीडियावर त्यांना कोणतीही माहिती नसताना कोणीतरी वेगळ्याच व्यक्तीने लोन घेतल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

इंडियाबुल्सनेही धनी अँपपवर लोन फ्रॉडबाबत तक्रारी आल्या असून त्याबाबत कंपनी तपास करत असल्याचं म्हटलं आहे. धनी अँपने 12 महिन्यात जवळपास 35 लाख लोकांना लोन दिलं आहे. गुगल प्ले स्टोरवर या अँपचे 5 कोटी डाउनलोड आहेत. तुमच्या पॅनवर इतर कोणी लोन घेतलं आहे का हे तुम्ही घरबसल्या तपासू शकता.

◆ असे तपासा तुमच्या पॅनवर कोणी लोन घेतलंय

इन्कम टॅक्स विभागाकडून फॉर्म 26AS ची सुविधा दिली जाते. याद्वारे तुम्ही पॅन कार्डचे डिटेल्स तपासू शकता. या फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती असते, की तुमच्या पॅन कार्डचा कुठे वापर करण्यात आला. हा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची अधिकृत वेबसाइट www.incometax.gov.in वर लॉगइन करावं लागेल. हा फॉर्म TRACES पोर्टलवरुनही डाउनलोड करू शकता.

◆ या ठिकाणी करा तक्रार

तुमची पॅन कार्डसंबंधी कोणतीही तक्रार असल्यास इन्कम टॅक्स पोर्टलवर ऑनलाइन तक्रार करू शकता. सर्वात आधी www.incometax.intelnetglobal.com वर जावं लागेल. इथे मागितलेले डिटेल्स भरुन सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर तक्रार करू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close