विशेष

उन्हाळ्यात लाल मुंग्यांचा वैताग आलाय ! मग हे पाच उपाय नक्की करा जाणून घ्या सविस्तर

उन्हाळ्यात लाल मुंग्यांचा वैताग आलाय ! मग हे पाच उपाय नक्की करा जाणून घ्या सविस्तर

◆ लाल मुंग्यांना पळण्यासाठी खालील उपाय नक्की करून पाहा

1. कपूर :- पुजा-आरतीसाठी उपयोगात येणाऱ्या कापुराचा उपयोग करुन कपाट आणि गादी उशांवरील मुंग्यांची समस्या घालवता येते. यासाठी कपड्यांच्या कपाटात, गादी, उशांखाली कापराची वडी ठेवावी. कापराच्या उग्र वासानं मुंग्या असल्यास निघून जातात आणि पुन्हा येत नाही.

2. मीठ:- स्वयंपाकघरातील मुंग्या, किडे यावर प्रभावी उपाय म्हणजे मीठ. मिठाचा उपाय करताना एका भांड्यात पाणी घ्यावं. त्यात भरपूर मीठ घालावं. मीठ घालून ते पाणी भरपूर उकळावं. नंतर हे पाणी सामान्य तापमानाला येवू द्यावं. हे पाणी एका स्प्रे बाॅटलमध्ये भरावं. जिथे जिथे मुंग्या नेहमी होतात त्या ठिकाही स्प्रे बाॅटलमधील मिठाचं पाणी फवारावं. मुंग्या असल्यास निघून जातात. मुंग्या होण्याच्या संभाव्य ठिकाणी हे पाणी फवारल्यास मुंग्या होत नाही.

3. लवंग :- ज्या ज्या ठिकाणी मुंग्या झालेल्या दिसतात त्या ठिकाणी लवंग ठेवल्यास मुंग्या निघून जातात. खाऊच्या डब्यात, साखरेच्या डब्यात लवंग ठेवावी. लवंगाच्या उग्र वासामुळे मुंग्या होत नाही.

4.रसायनयुक्त खडू:- मुंग्यांना नियंत्रित करणारे रसायनयुक्त खडू मेडिकल/ दुकानांमध्ये मिळतात. हे रसायनयुक्त खडू वापरायचे नसल्यास साधे फळ्यावर लिहायचे वापरल्यास त्याचाही उपयोग मुंग्या नियंतत्रित करण्यासाठी होतो. खडुमध्ये कॅल्शियम कार्बोनेट हा घटक असतो. मुंग्याना नियंत्रित करण्यासाठी/ रोखण्यासाठी या खडुचा उपयोग होतो.

5. तिखट :- लाल मुंग्यांचं प्रमाण जास्त असल्यास त्या ठिकाणी थोडी तिखटाची पूड भुरभुरावी. तिखटाच्या वापरानं मुंग्या लगेच गायब होतात. मुंग्याच्या संभाव्य ठिकाणी तिखट भुरभुरुन ठेवल्यास मुंग्या होत नाही.

◆ अन्न पदार्थ सांडलेले असल्यास, डब्यांना, कपाला चिगट ओघळ असल्यास, डब्बे नीट लावलेले नसल्यास मुंग्या होतात. त्यामुळे स्वच्छता ठेवल्यास, डब्बे नीट लावून ठेवल्यास , मुंग्या न होण्यासाठी मीठ पाणी फवारणं, खडुंच्या रेषा ओढून ठेवणं, ही काळ्जी घेतल्यास मुंग्यांवर नियंत्रण मिळवता येतं.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close