तंत्रज्ञान

आजच चालू करा स्वतःचा व्यवसाय इलेक्टिक चार्जिंग स्टेशन

 

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता लोकांची पसंती सध्या वेगाने इलेक्ट्रिक वाहनांकडे जात आहे.

इंधनाच्या किंमतींव्यतिरिक्त, बरेच लोक पर्यावरणाच्या सुरक्षिततेचा विचार करून इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.

येणारा काळ हा फक्त इलेक्ट्रिक वाहनांचा असणार आहे यात काही शंका नाही. या पर्वाचा आता शुभारंभ दणक्यात झाला आहे. आता रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असल्याने, ही वाहने चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशनचीही गरज निर्माण झाली आहे.

इलेक्ट्रिक वाहनांचा सध्याचा काळ पाहता, चार्जिंग स्टेशन सुरू करणे देखील गुंतवणूकीच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर ठरत आहे. जेव्हा काही वर्षांनी इलेक्ट्रीक वाहनांची संख्या वाढेल तेव्हा तुमचा नफा तितक्याच वेगाने वाढत जाईल.

चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी किती खर्च येईल…

सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी आपल्याकडे किमान ३०० ते ५०० चौरस फूट जागा असावी, जेणेकरून एका वेळी 2-3 कार सहजपणे चार्ज करता येतील.

फास्ट चार्जिंग स्टेशन बसवण्यासाठी १६.५ लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. यात वीज, सिव्हिल वर्क, मेंटेनन्स, चार्जिंग उपकरणे अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. जर तुम्ही तुमचे चार्जिंग स्टेशन १६ तास चालवले तर तुम्ही चौथ्या वर्षीच ३.५ रुपये प्रति युनिट दराने तुमची संपूर्ण किंमत वसूल करू शकता.

सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी, तुम्हाला तुमच्या राज्याच्या ऊर्जा विभागाशी संपर्क साधावा लागेल. या व्यतिरिक्त, तुम्ही टाटा पॉवर, डेल्टा इलेक्ट्रॉनिक्स, इव्हॉल्ट, पॅनासोनिक सारख्या चार्जिंग स्टेशन स्थापित करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधू शकता. या अर्थाने, चार्जिंग स्टेशन सुरू करणे ही एक नवा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना असू शकते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close