ब्रेकिंग न्युजराज्यहवामान

राज्यात आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा ! काही भागात गुलाब चक्रीवादलाचा परिणाम

⛈️ *राज्यात आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा ! काही भागात गुलाब चक्रीवादलाचा परिणाम*

 

बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम होणार असून, काही भागांना अतिवृष्टीचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.२७ आणि २८ सप्टेंबरला राज्यात पावसाचे प्रमाण अधिक राहणार आहे.

🤔 या जिल्ह्यांना पावसाचा इशारा !

🌦️ कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्य़ात २७, २८ सप्टेंबरला काही ठिकाणी अतिवृष्टी, तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

⛈️ उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबारमध्येही या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा आहे. नाशिक, पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आदी जिल्ह्य़ांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.

☔ मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना, परभणी, िहगोली, नांदेड आदी जिल्ह्य़ांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

💁🏻‍♂️ विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्य़ात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर यवतमाळ, गडचिरोलीसह इतर भागांतही पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा_* 👉 https://lokmajha.com
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close