Uncategorizedतंत्रज्ञान

अरे बापरे व्हाट्सअप्प पे वर 1 रुपया ट्रान्सफर करून मिळेल 51 रुपये कॅशबॅक

 

◆ अरे बापरे व्हाट्सअप्प पे वर 1 रुपया ट्रान्सफर करून मिळेल 51 रुपये कॅशबॅक

● जाणून घ्या काय आहे प्रोसेस

◆ व्हॉट्सअँप पे ने कॅशबॅक ऑफर सादर केली आहे. प्रत्येक ट्रान्जॅक्शनवर 51 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे.

◆ कसा मिळेल कॅशबॅक

◆ तुम्ही एखाद्याला किती पैसे ट्रान्सफर करता याची कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे केवळ 1 रुपया ट्रान्सफर करुन तुम्ही 51 रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकता. ही प्रमोशनल ऑफर असल्याने पहिल्या 5 ट्रान्जॅक्शनवर उपलब्ध आहे.

◆ यातून तुम्हाला थेट 255 रुपये मिळू शकतात. हे पैसे तुमच्या WhatsApp Pay सेवेशी लिंक केलेल्या तुमच्या बँक खात्यात पैसे लगेच जमा केले जातील. मात्र ही ऑफर काही काळासाटी केवळ अँड्रॉईड स्मार्टफोन पुरतीच मर्यादीत आहे.

◆ WhatsApp Pay कसं सेट कराल ?

1. कोणत्याही WhatsApp chat मधील टेक्स एरिया मधील “Re” आयकॉनवर क्लिक करा.

2. पेमेंट मेथड ऍड करण्यासाठी तुम्हाला हाट्सअप्प कडून नोटीफिकेशन येईल. त्यावर क्लिक करा.

3.यादीत असलेल्या बँकेच्या नावाची निवड करा.

4. तुमचा व्हाट्सअप्प नंबर तुमच्या बँकेच्या नोंदणीकृत मोबाईल फोनशी जुळतो का हे दोनदा तपासा.

5. त्यानंतर तुमची ओळख पटवून घेण्यासाठी तुमच्या फोनवर SMS येईल.

6. तुमच्याकडे आधीच UPI पिन असल्यास, तुमची सेवा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला आता फक्त तो प्रविष्ट करावा लागेल. जर तुम्ही पहिल्यांदा UPI वापरत असाल, तर तुम्हाला नवीन पिन तयार करावा लागेल.

◆ सध्या ही ऑफर फक्त Android च्या बीटा यूजरसाठी उपलब्ध आहे . लवकरच ही ऑफर इतर युजर्ससाठीही खुली करणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे . पेमेंट केल्यानंतर लगेच तुमच्या खात्यात 51 रुपयांचा कॅशबॅक ट्रान्सफर केला जाईल असे कंपनीने सांगितले आहे .

◆ याआधी गुगल पे ने युजर्संना आकर्षित करण्यासाठी ही ऑफर सादर केली होती. प्रत्येक ट्रान्जॅक्शननंतर युजर्संना scratch card मिळत असे. त्यात कॅशबॅक, कूपन्स आणि इतर फायदे दिले जात. अजूनही ही रिव्हॉर्ड्स पद्धत गुगल पे कडे कायम आहे.

 

😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा  https://lokmajha.com

 

जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close