ब्रेकिंग न्युज

Agneepath Scheme अग्निपथ योजनेतील भरती प्रकिया दोन दिवसात सुरू होणार , लष्करप्रमुखांची घोषणा

Agneepath Scheme अग्निपथ योजनेतील भरती प्रकिया दोन दिवसात सुरू होणार , लष्करप्रमुखांची घोषणा

Agneepath Scheme :- अग्निपथ योजनेबाबत देशभरात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनादरम्यान, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले की, भरती प्रक्रियेसंबंधी अधिसूचना येत्या दोन दिवसांत जारी करण्यात येणार आहे. ही अधिसूचना भारतीय लष्कराच्या https://joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर जारी केली जाईल.

■ या वर्षी डिसेंबरपर्यंत लष्कराला पहिला अग्निवीर मिळेल आणि पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत ते तिन्ही सेवांमध्ये ऑपरेशनल आणि नॉन-ऑपरेशनल तैनातीसाठी तैनात केले जातील.

■ लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे पुढे म्हणाले, ‘लवकरच भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यासंबंधीची अधिसूचना येत्या दोन दिवसांत जारी केली जाईल. यानंतर, नोंदणी, भरती प्रक्रिया इत्यादींचे वेळापत्रक सैन्याकडून जारी केले जाईल.

■ ‘भरती प्रक्रिया झाल्यानंतर या वर्षाच्या अखेरीस पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरु होईल.’ एवढंच नाही तर विद्यार्थ्यांच्या (Students) विरोधाच्या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘तरुणांना याबाबत पूर्ण माहिती नाही. एकदा ते त्याचा एक भाग झाल्यानंतर आणि संपूर्ण गोष्ट समजून घेतल्यानंतर ते निषेध करणार नाहीत.’

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close