ब्रेकिंग न्युज

1 सप्टेंबर पासून हे महत्वाचे बदल होणार त्याचा होईल थेट तुमच्या खिशावर परिणाम

1 सप्टेंबर पासून हे महत्वाचे बदल होणार त्याचा होईल थेट तुमच्या खिशावर परिणाम

Rules Changes From 1 September: सप्टेंबर महिन्याची सुरवात काही महत्त्वाच्या बदलांनी होणार आहे. टोल टॅक्स, बँकिंग , मालमत्ता अशा अनेक सेवांमद्ये बदल होणार आहेत.
ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. याशिवाय दररोजच्या वापरातल्या गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ होऊ शकते. जाणून घेऊन सप्टेंबरपासून कोणते नियम बदलणार आहेत.

1. गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता
सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. यावेळीही म्हणजेच 1 सप्टेंबरला गॅस सिलिंडरचे नवे दर जारी केले जातील. यात वाढ होऊ शकते किंवा किंमती कमीही होऊ शकतात.

2. विमा पॉलिसी कमी होणार
IRDAI दिलेल्या माहितीनुसार 1 सप्टेंबरपासून विमा पॉलिसीचा प्रीमियम कमी केला जाईल. IRDA ने विम्याच्या नियमांमध्ये केलेल्या बदलांनंतर ग्राहकांना आता एजंटला 30 ते 35 टक्के ऐवजी फक्त 20 टक्के कमिशन द्यावं लागणार आहे. त्यामुळे लोकांचा प्रीमियम कमी होईल.

3. पीएनबी ग्राहकांसाठी महत्त्वाचं
पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना 31 ऑगस्टपर्यंत त्यांचे KYC अपडेट करावे लागतील. असं न केल्यास सप्टेंबरपासून तुमचं खातें ब्लॉक केलं जाईल. म्हणजेच तुम्हाला तुमचं खातं वापरण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

4. टोल टॅक्समध्ये होणार वाढ
दिल्लीतील यमुना एक्स्प्रेस वेवरील टोल टॅक्समध्ये वाढ होणार आहे. म्हणजेच 1 सप्टेंबरपासून तुम्हाला जास्त कर भरावा लागणार आहे. छोट्या वाहनधारकांना या एक्स्प्रेस वेवरून प्रवास करण्यासाठी प्रति किलोमीटर 10 पैसे अधिक मोजावे लागतील. त्याचबरोबर व्यावसायिक वाहनांना 52 पैसे अधिक टोल टॅक्स भरावा लागणार आहे.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close