तंत्रज्ञान

लसीकरण चे प्रमाणपत्र मिळवा तुमच्या व्हाट्सअँपवर असे करा डाउनलोड

 

लसीकरण चे प्रमाणपत्र मिळवा तुमच्या व्हाट्सअँपवर असे करा डाउनलोड

◆ प्रवास करण्यासाठी तसेच विविध ठिकाणी आता कोविड -१९ लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कोविड १९ लस प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी दोन योग्य आणि सोपे पर्याय आहेत.

◆ एक तर कोविन पोर्टलला भेट द्या किंवा आरोग्य सेतू कोविड लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करा. आता हे प्रमाणपत्र थेट व्हॉटसअँपवर मिळविणे शक्य होत आहे.

◆ भारत सरकारने व्हॉट्सअ‍ॅपशी सहकार्य केले असून प्रत्येकाला त्यांचे कोविड लस प्रमाणपत्र डाउनलोड करणे अधिक सोपे होत आहे. MyGov कोरोना हेल्पडेस्क व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट डाउनलोड करू शकता. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कोविड -१९ लस प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे यासाठी सोप्या टप्प्यांचे फक्त पालन करावे लागणार आहे.

◆ असे मिळवा व्हाट्सअप्प वर प्रमाणपत्र

1. MyGov कोरोना हेल्पडेस्क व्हॉट्सअ‍ॅप नंबर +91 9013151515 हा नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करा.

2: नंबर सेव्ह झाल्यानंतर, व्हॉट्सअ‍ॅप उघडा.

3: चॅट सूचीमध्ये नंबर शोधा आणि त्या नंबरवर HI type करून पाठवा

4. त्यानंतर तिकडून एक लिस्ट येईल त्यात 2 नंबरवरील
Vaccination – Book Appointment, Download Certificate, Centre & FAQ हा पर्याय आहे

4.तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये 2 type करून पाठवायचं आहे
तिकडून परत एक लिस्ट येईल परत 2 नंबर वरील Download Covid Vaccination Certificate हा पर्याय आहे चॅट बॉक्समध्ये 2 type करून पाठवा

5.त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक सहा अंकी otp येईल तो type करून पाठवा तुमचं नाव आल्यावर 1 type करून पाठवा

6.आता तुमचं लसीकरण प्रमाणपत्र pdf फाईल मध्ये प्राप्त होईल ते डाउनलोड करून घ्या

◆ तसेच चॅटबॉट सर्व्हरने एरर दाखवली, तर फक्त अधिकृत CoWIN पोर्टलला भेट देऊ शकता किंवा कोविड लस प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी आरोग्य सेतू वर जाऊ शकता.
➖➖➖➖➖➖➖➖
*😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा_* 👉 https://lokmajha.com
➖➖➖➖➖➖➖➖
*जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close