देश

गॅस कनेक्शन मोफत हवे आहे का ? या सरकारी योजनेसाठी आजच अर्ज करा जाणून घ्या प्रोसेस

गॅस कनेक्शन मोफत हवे आहे का ? या सरकारी योजनेसाठी आजच अर्ज करा जाणून घ्या प्रोसेस

देशातील गरीब वर्गाला गॅस सिलिंडरची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने 1 मे 2016 रोजी (PM Ujjwala Yojna ) प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत सरकारी एपीएल आणि बीपीएल कार्डधारकांना गॅस सिलिंडरची सुविधा मोफत मिळते. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ही योजना सुरु केली होती.

◆ काय आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ?

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत, सरकार दारिद्र्यरेषेखालील आणि एपीएल कार्डधारकांना मोफत गॅस सिलिंडर दिले जाते. सरकार सर्व गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर पुरवते. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने आतापर्यंत करोडो महिलांना मोफत गॅस सिलिंडरचे वाटप केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असते आवश्यक आहे.

◆ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची पात्रता

1.दारिद्र्यरेषेखालील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या लोकांकडे बीपीएल (दारिद्रय रेषेखालील) शिधापत्रिका असावी.
2.तुम्ही जर वनवासी किंवा मागासवर्गीय असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
3.तुमच्याकडे आधीपासूनच गॅस कनेक्शन नसावे.
4.घरातील महिलेचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
5.तुमचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

◆ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

1.आधार कार्ड (Aadhaar Card)
2.पासपोर्ट साइज फोटो (Passport Size Photo)
3.मोबाईल नंबर (Mobile Number)
4.बँक पासबुकची प्रत (Bank Passbook)
5.रेशन कार्ड (Ration Card)
6.BPL कार्ड (BPL Card)

◆ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज कसा करावा?

1.तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
2.यासाठी तुम्ही याच्या अधिकृत वेबसाइट pmujjwalayojana.com ला भेट देऊ शकता.
3.येथून एक फॉर्म डाउनलोड करा. हा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही तो एलपीजी केंद्रात जमा करा.
4.यानंतर तुम्हाला नवीन एलपीजी कनेक्शन सहज मिळेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close