तंत्रज्ञान

व्हाट्सअँप वरून डाउनलोड करता येईल पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स सह अनेक कागदत्र जाणून घ्या अधिक

व्हाट्सअँप वरून डाउनलोड करता येईल पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स सह अनेक कागदत्र जाणून घ्या अधिक

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने लोकांना मोठा दिलासा दिला आहे. आता लोकांना व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्ससह इतर कागदपत्रे डाउनलोड करता येणार आहेत. डिजीलॉकर सेवेचा वापर करण्यासाठी लोक आता WhatsApp वरील MyGov हेल्पडेस्कमध्ये प्रवेश करू शकतील, मंत्रालयाने म्हटलं आहे.

लोकांचं डिजीलॉकर खाते तयार करून प्रमाणीकरण करणे, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे डाउनलोड करणे अशा सर्व सुविधा व्हॉट्सअॅपवर दिल्या जातील.(Now many documents including PAN card, DL can be downloaded from WhatsApp)

◆ हे कागदपत्र करू शकतात डाउनलोड

या अंतर्गत लोक पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सीबीएसई इयत्ता दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी), दहावीची मार्कशीट, बारावीची मार्कशीट, विमा पॉलिसीची इत्यादी कागदपत्रे ठेवू शकतात.

◆ कसे वापरता येईल व्हॉट्सअ‍ॅपवरील डिजिलॉकर

1.देशभरातील WhatsApp वापरकर्ते WhatsApp क्रमांक +91 9013151515 वर ‘हॅलो किंवा हाय किंवा डिजिलॉकर’ संदेश पाठवून चॅटबॉटचा वापर करू शकतात.

2.यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट डाउनलोड करायचे आहे, ते डिजिलॉकरवरून डाउनलोड करता येऊ शकते. WhatsApp वर DigiLocker सारखे वैशिष्ट्य, MyGov चॅटबॉट हे नागरिकांना संसाधने आणि अत्यावश्यक सेवांमध्ये प्रवेश करण्याच्या उद्देशाने आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖

📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*

➖➖➖➖➖➖➖➖➖

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close