तंत्रज्ञान

मोबाईल फोन सतत हँग होतोय मग या 3 टिप्स वापरून होईल सुपरफास्ट

मोबाईल फोन सतत हँग होतोय मग या 3 टिप्स वापरून होईल सुपरफास्ट

फोनमध्ये भरपूर अ‍ॅप्स असल्यामुळे तो सतत हँग होतो. जर तुम्हालाही तुमच्या फोनकडून ही तक्रार असेल तर काही सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचा फोन पूर्ववत करू शकता. यामुळे तुमचा फोन हँगही होणार नाही आणि फोन अगदी सुपरफास्ट चालेल. जाणून घेऊया या टिप्स.

◆ तुमचा मोबाईल डीप क्लीनिंग करा

तुम्हालाही माहित असेल की फोन सतत हँग होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे फोनमधील स्टोरेजची कमतरता. अशावेळी जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची डीप क्लिनिंग करता, तर फोन हँग होण्याची समस्या चुटकीसरशी नष्ट होईल.

डीप क्लीन करणे म्हणजे फोनमधील अशा फाईल्स डिलीट करणे ज्यांची तुम्हाला गरज नाही आहे किंवा ज्या एकापेक्षा जास्त वेळा डाउनलोड झाल्या आहेत. असे केल्याने तुमच्या फोनमधील मेमरी रिकामी होईल, प्रोसेसरवर दबाव पडणार नाही आणि फोन हँग देखील होणार नाही.

◆ ‘या’ फाइल्स डिलीट कराच

तुमच्या स्मार्टफोनमध्ये जागा बनवण्यासाठी आणि फोन हँग होण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून डुप्लिकेट फाईल्स डिलीट करणे अत्यंत आवश्यक आहे. हे ते फोटो, व्हिडिओ आणि कागदपत्रे आहेत जी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर एकापेक्षा जास्त वेळा डाउनलोड केली आहेत. या डुप्लिकेट फाइल्स डिलीट केल्यास तुमचा स्मार्टफोन पुन्हा पुन्हा हँग होणार नाही.

◆ कॅशे (Cache) डेटा क्लिअर करा

आपल्या स्मार्टफोनमध्ये काही फाइल्स अशा असतात ज्यांना कॅशे (Cache) या नावाने ओळखले जाते. या फाइल्सची सहसा फारशी गरज नसते. जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनची मेमरी मोकळी करायची असेल किंवा फोन हँग होण्याची समस्या सोडवायची असेल, तर तुम्ही सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमधील कॅशे क्लीअर करावे. यासाठी तुम्ही क्लिनर अ‍ॅप्सचा देखील अवलंब करू शकता.

तुम्ही या तीन सोप्या टिप्स फॉलो केल्यास तुमचा स्मार्टफोन पुन्हा पुन्हा हँग होणार नाही आणि तुम्हाला जास्त स्टोरेज स्पेसही मिळेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close