Uncategorized

ATM मधून पैसे काढताना Green लाईटवर द्या लक्ष नाहीतर तुमचेही खात होईल रिकामं

ATM मधून पैसे काढताना Green लाईटवर द्या लक्ष नाहीतर तुमचेही खात होईल रिकामं

गेल्या काही दिवसांपासून ATM फसवणुकीशी संबंधित नवीन प्रकरणे दररोज समोर येत आहेत, त्यामुळे जेव्हाही तुम्ही एटीएममधून पैसे काढाल तेव्हा नेहमीच सावध व्हा.

एटीएममधून पैसे काढताना या गोष्टींना तुम्ही काळजीपूर्वक तपासले पाहिजे. एटीएममध्ये सर्वात मोठा धोका कार्ड क्लोनिंगचा आहे. ज्यामुळे तुमच्या कार्डची माहिती सहज चोरली जाऊ शकते आणि, तुमच्या कार्डसारखाच दुसरा कार्ड बनवून घेतला जाऊ शकतो.

◆ आजकाल हॅकर्स खूप हुशार झाले आहेत.

हे हॅकर्स एटीएम मशिनमध्ये कार्ड टाकण्याच्या स्लॉटमधून ग्राहकाचा डेटा चोरतात. वास्तविक, ते एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटमध्ये असे उपकरण बसवतात, जे तुमच्या कार्डची संपूर्ण माहिती स्कॅन करते. यासह, तुमचे सर्व तपशील त्या डिव्हाइसवर जातात. यानंतर ते ब्लूटूथ किंवा इतर कोणत्याही वायरलेस उपकरणातून हा डेटा चोरतात आणि तुमच्या बँकेतून पैसे काढतात.

परंतु, आता तुम्ही म्हणाल की, यासाठी हॅकरकडे पिन क्रमांक असणे अनिवार्य आहे. परंतु ययासाठी देखील हे हॅकर्सचीही एक पद्धत वापरतात. हे हॅकर्स कॅमेराने तुमचा पिन नंबर ट्रॅक करतात. त्यामुळे या ठग्यांना कमी समजू नका.

यासाठी नेहमीच ओळखीच्या आणि वॉचमेन असलेल्या ठिकाणाहून पैसे काढा. अनोळखी भागात एटीएम वापनं शक्यतो टाळा आणि तुमचा पिन नंबर टाकताना तो एका हाताने झाका. या सोप्या गोष्टी करुन देखील तुम्ही तुमची फसवणूक रोखू शकता.

◆ ATM मध्ये गेल्यास या गोष्टी नक्की लक्ष्यात ठेवा

1-एटीएममध्ये जाताना एटीएम मशीनचा कार्ड टाकण्याचा स्लॉट तपासा.
2-एटीएम कार्ड स्लॉटमध्ये काही छेडछाड झाली आहे किंवा स्लॉट सैल झाला आहे ते पाहा. जर तुम्हाला संशय आला तर तो वापरु नका
3-याशिवाय कार्ड स्लॉटमध्ये कार्ड टाकताना त्यामध्ये पेटणाऱ्या ‘ग्रीन लाइट’वर लक्ष ठेवा.
4-जर इथल्या स्लॉटमध्ये हिरवा दिवा असेल तर तुमचे एटीएम सुरक्षित आहे.
5-पण त्यात लाल किंवा इतर कोणताही दिवा नसेल तर ते एटीएम वापरू नका.

◆ अशा परिस्थितीत पोलिसांना नक्की कळवा

तुम्हीही कोणत्याही एटीएममध्ये गेलात आणि तिथे तुम्हाला हॅकर्सच्या जाळ्यात अडकल्याचे जाणवत असेल आणि बँकही बंद असेल, तर तुम्ही ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधावा. योग्य वेळी पोलिसांना ही माहिती दिल्यास पोलिसांना चोरांपर्यंत पोहोचने शक्य होईल. ज्यामुळे दुसऱ्या लोकांची देखील फसवणूक होणार नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close