क्रीडा

आजपासून रंगणार आयपीएल चा थरार पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात होणार

◆ आयपीएल 2021 च्या दुसऱ्या राऊंडला 19 सप्टेंबर म्हणजेच आजपासून सुरुवात होणार आहे. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात होणार आहे.

◆ हा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल, तर टॉस 7 वाजता होईल. मुंबई चौथ्या क्रमांकावर आयपीएल 2021 च्या पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स चौथ्या क्रमांकावर आहे. टीमने 7 पैकी 4 मॅच जिंकल्या, त्यामुळे त्यांच्या खात्यात 8 पॉईंट्स आहेत.

◆ चेन्नई 10 पॉईंट्ससह दुसऱ्या आणि बँगलोरही 10 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. याआधी याच मोसमात चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईचा शेवटच्या बॉलवर रोमांचक विजय झाला होता. चेन्नईने पहिले बॅटिंग करत 218/4 एवढा स्कोअर केला. या आव्हानाचा पाठलाग मुंबईने अखेरच्या बॉलवर 6 विकेट गमावून केला.

◆ मुंबई आणि चेन्नई यांच्यात आतापर्यंत 31 मॅच झाल्या, यातल्या 19 मॅचमध्ये मुंबईचा तर 12 मॅचमध्ये चेन्नईचा विजय झाला. मागच्या मोसमात दोन्ही टीमनी एक-एक मॅच जिंकली.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close