आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी चांगलं असत भेंडीच पाणी आजपासूनच सुरू करा प्यायला हे आहेत जबरदस्त फायदे

 

Health निरोगी आरोग्यासाठी चांगलं असत भेंडीच पाणी आजपासूनच सुरू करा प्यायला हे आहेत जबरदस्त फायदे

अलीकडच्या काळात गंभीर आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. हृदयविकार, डायबेटिसच्या रुग्णांमध्ये तर सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

◆ कोणत्याही स्वरुपाच्या आजारावर मात करण्यासाठी किंवा असे आजार होऊ नयेत यासाठी आहाराकडे (Diet) लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्याकडे रोजच्या आहारात पालेभाज्या-फळभाज्यांचा (Vegetables) समावेश करा, असं सांगितलं जातं. कारण या सर्व भाज्या शरीरासाठी पोषक मानल्या जातात. भेंडीची भाजी (Lady Finger) ही त्यापैकीच एक होय.

◆ भेंडीमुळे अनेक शारीरिक समस्या दूर होतात. केवळ भेंडीची भाजीच नाही तर भेंडीचं पाणीदेखील (Lady Finger Water) आरोग्यसाठी (Health) हितावह मानलं जातं. `लोकमत न्यूज`ने याविषयीची माहिती दिली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत भेंडीचं सेवन प्राधान्यानं केलं जातं.

◆ भेंडी शरीरासाठी पोषक मानली जाते. भेंडीत व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि लोह हे घटक मुबलक प्रमाणात असतात. लठ्ठपणा (Obesity) आणि बद्धकोष्ठता (Constipation) या समस्यांवर भेंडी गुणकारी आहे. भेंडीची भाजी तसंच भेंडीचं पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

◆ भेंडीचं पाणी प्यायल्यानं शरीराला खूप फायदे होतात. भेंडीचं पाणी तयार करण्याची विशिष्ठ अशी रेसिपी (Recipe) आहे. भेंडीचं पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाणी घ्यावं. त्यात भेंडीचे 3-4 तुकडे टाकावे.

◆ हे पाणी रात्रभर तसंच ठेवावं आणि सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी प्यावं. पत्नीला पाहिलं बॉयफ्रेंडच्या कुशीत; चिठ्ठी लिहून पतीनं घेतला टोकाचं निर्णय ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांच्यासाठी भेंडी अतिशय गुणकारी आहे. भेंडीत फायबर मुबलक प्रमाणात असतं. भेंडीचं पाणी प्यायल्यामुळे पोट साफ राहतं आणि पोटाचे विकार होतात.

◆ अ‍ॅनिमिया (Anaemia) हा गंभीर स्वरुपाचा आजार मानला जातो. मात्र भेंडीच्या पाण्यामुळे तो दूर होऊ शकतो. भेंडीमध्ये लोह मुबलक असतं. त्यामुळे शरीरातलं हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

◆ हिमोग्लोबीन वाढल्याने अ‍ॅनिमिया बरा होतो. तसंच भेंडीतल्या व्हिटॅमिनमुळे रक्तस्त्राव रोखला जाऊ शकतो. आज अनेक लोक लठ्ठपणाच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. मात्र भेंडीचं पाणी हा या समस्येवरचा उत्तम उपाय आहे.

◆ भेंडीच्या पाण्यातल्या फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि वजनदेखील नियंत्रणात राहतं. त्यामुळे वजन नियंत्रणासाठी रोज भेंडीचं पाणी पिणं आवश्यक आहे. भेंडीच्या पाण्यात व्हिटॅमिन सी मुबलक असतं. शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी भेंडीचं पाणी उपयुक्त ठरतं.

◆ तसंच या पाण्यामुळे अ‍ॅलर्जीचा त्रास होत नाही. उन्हाळ्यात रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यासाठी हे पाणी रोज पिणं आवश्यक आहे. भेंडीच्या पाण्यात व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटिन असतं. यामुळे दृष्टी चांगली होते. त्यामुळे ज्यांना दृष्टिदोष आहेत, त्यांनी भेंडी खावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close