ब्रेकिंग न्युज

HSC Result 12 वीच्या निकालाची तारीख ठरली पहा कधी आणि कुठे पाहता येईल निकाल

HSC Result 12 वीच्या निकालाची तारीख ठरली पहा कधी आणि कुठे पाहता येईल निकाल

HSC Result 2022 :-यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता या परीक्षांचा निकाल लागणार आहे. आताच समोर आलेल्या माहितीनुसार, उद्या 12 वीचा निकाल लागणार (Result of 12th will be Announced Tomorrow) आहे.

उद्या म्हणजे 08 जून रोजी राज्यातील 12 वीचा निकाल लागेल. राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यानुसार उद्या म्हणजेच 08 जूनला बारावीचा निकाल लागणार आहे. किती वाजता जाहीर होणार निकाल दरवर्षी प्रमाणे यंदाही बारावी बोर्डाचा निकाल हे सुमारे दुपारी एक वाजताच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.

हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येईल अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

येथे पाहता येईल ऑनलाईन निकाल

निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकतील. www.mahresult.nic.in, https://www.mahahsscboard.in/

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close