राज्य

धुळे चाळीसगाव रेल्वे या तारखेपासून धावणार सर्वसामान्यांना दिलासा

 

धुळे चाळीसगाव रेल्वे या तारखेपासून धावणार सर्वसामान्यांना दिलासा

◆ कोरोनामुळे बंद असलेली आठ डब्याची मेमू गाडी धुळे-चाळीसगाव ही रेल्वे सोमवार १३ डिसेंबर पासून धावणार असल्याची माहिती भुसावळ रेल्वे प्रशासनाने दिली आहे.गोरगरीब, मध्यमवर्गीयांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी व सुरक्षित प्रवास म्हणून या रेल्वे वाहतुकीकडे पाहिले जाते.सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

◆ लोकप्रतिनिधींच्या पाठपूराव्यामुळे दिवसातून दोन वेळा या गाडीच्या फेऱ्या होणार आहे. मात्र रविवारी बंद ठेवण्यात येणार आहे.

◆ चाळीसगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी पॅसेंजर गाडी सुरू करण्यासंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानबवे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता शिवाय प्रवाशांसह प्रवासी संघटनांनीदेखील वेळोवेळी या संदर्भात मागणी लावून धरली होती. अखेर मागणीला यश आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

◆ या वेळेत धावणार रेल्वे

मेमू गाडी क्रमांक 01303 ही चाळीसगाव येथून पहाटे 6.30 निघाल्यानंतर धुळ्यात 7.35 वाजता पोहोचणार आहे तर मेमू गाडी क्रमांक 01313 सायंकाळी 5.30 वाजता चाळीसगाव येथून सुटल्यानंतर 6.35 वाजता धुळ्यात पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात धुळे येथून गाडी क्रमांक 01304 सकाळी 7.50 वाजता सुटल्यानंतर सकाळी 8.55 वाजता चाळीसगावात पोहोचणार आहे तसेच गाडी क्रमांक 01314 सायंकाळी 7.20 वाजता सुटल्यानंतर रात्री 8.25 वाजता चाळीसगावात पोहोचणार आहे.

◆ धुळे-चाळीसगाव मार्गावर एकही एक्स्प्रेस अथवा पॅसेंजर सुरू नसल्याने सातत्याने पॅसेंजर सुरू करण्याची मागणी होत होती. गोरगरीब, मध्यमवर्गीयांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी व सुरक्षित प्रवास म्हणून या रेल्वे वाहतुकीकडे पाहिले जाते. सोमवार, 13 डिसेंबरपासून मेमू गाडी सुरू करण्याचा निर्णयामुळे चाकरमान्यांसह रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
*😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा_* 👉 https://lokmajha.com
➖➖➖➖➖➖➖➖
*जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close