राज्य

Reshan Card Update – तर तुमचेही रेशन कार्ड होऊ शकते रद्द,जाणून घ्या नवीन नियम

Reshan Card Update – तर तुमचेही रेशन कार्ड होऊ शकते रद्द,जाणून घ्या नवीन नियम

 • रेशन कार्ड (Ration Card) ही सर्वसामान्यांच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाची बाब आहे. तुम्ही जर रेशन कार्डचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

राज्य सरकार वेळोवेळी शिधापत्रिकांची यादी अद्ययावत (Ration card list updation) करत असते. त्यात काही तफावत आढळल्यास शिधापत्रिकाही रद्द केली जाते. या अंतर्गत, जर तुम्ही तुमचे रेशन कार्ड बराच काळ धान्य घेण्यासाठी वापरले नसेल, तर तुमचे कार्ड रद्द केले जाऊ शकते

 • तुमची शिधापत्रिका होऊ शकते रद्द

वास्तविक, तुम्ही शिधावाटप विभागात कोणत्या महिन्यात रेशन घेतले आहे आणि तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत, अशी सर्व माहिती शिधापत्रिकेवर असते. नियमांनुसार, तुमच्या नावावर शिधापत्रिका असल्यासच तुम्हाला पीडीएसवर धान्य मिळेल. परंतु, अलीकडेच अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये अशा सर्व शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या, ज्यांचा बराच काळ वापर झाला नाही.

• नियम काय आहे?

विभागाच्या म्हणण्यानुसार, ‘एखाद्या शिधापत्रिकाधारकाने सहा महिन्यांपासून रेशन घेतले नाही, तर नियमांनुसार त्याला स्वस्त दरात उपलब्ध धान्याची गरज नसल्याचे सिद्ध होते त्यामुळे तो रेशन घेण्यास पात्र नाही. अशा परिस्थितीत या कारणांच्या आधारे, सहा महिन्यांपासून रेशन न घेतलेल्या व्यक्तीचे रेशनकार्ड रद्द केले जाते. दिल्ली, बिहार आणि झारखंडमध्ये रेशनबाबत हाच नियम लागू आहे.

 • रेशन कार्ड पुन्हा सक्रिय करण्याची प्रक्रिया –

अशा परिस्थितीत तुमचे रेशनकार्ड रद्द झाले असेल तर तुम्ही ते पुन्हा सक्रिय करू शकता. यासाठी, तुम्हाला तुमच्या राज्यातील AePDS च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन काही औपचारिकता पूर्ण कराव्या लागतील. एवढेच नाही तर तुम्ही संपूर्ण भारतातील AePDS रेशन कार्ड पोर्टलला भेट देऊन ते सक्रिय करू शकता.

1.-प्रथम तुम्ही राज्य किंवा केंद्रीय AePDS पोर्टलवर जा.

2-आता ‘रेशन कार्ड करेक्शन’ हा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.

3-आता तुम्ही शिधापत्रिका दुरुस्ती पृष्ठावर जा आणि तुमचा शिधा क्रमांक शोधण्यासाठी फॉर्म भरा.

4-आता तुमच्या शिधापत्रिकेच्या माहितीत काही चूक असल्यास ती दुरुस्त करा.

5-दुरुस्ती केल्यानंतर, स्थानिक PDS कार्यालयाला भेट द्या आणि पुनरावलोकन अर्ज सबमिट करा.

6-जर तुमचा शिधापत्रिका सक्रिय करण्याचा अर्ज स्वीकारला गेला, तर तुमचे रद्द केलेले शिधापत्रिका पुन्हा सक्रिय केले जाईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖

📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*

➖➖➖➖➖➖➖➖➖

📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close