विशेष

Post Office Life Insurance पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना अवघ्या 299 रुपयात 10 लाख रुपयांचा विमा जाणून घ्या अधिक

Post Office Life Insurance पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना अवघ्या 299 रुपयात 10 लाख रुपयांचा विमा जाणून घ्या अधिक

Post Office Life Insurance भारतीय टपाल खाते (Indian Post Office) आणि टाटा एआयजी विमा कंपनीने (Tata AIG Insurance Company) विमा क्षेत्रात क्रांतीकारक योजना आणली आहे.

काय आहेत योजनेची वैशिष्ट्ये

या योजनेत व्यक्तीला अवघ्या 299 किंवा 399 रुपयांच्या हप्तामध्ये एका वर्षात 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळवू शकते. यामध्ये विमाधारकाचा अपघाती मृत्यू (Accidental Death), अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व असल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाईल.

याशिवाय या विम्यामध्ये रुग्णालयात दाखल झाल्यास 60 हजार रुपयांपर्यंतचा खर्च आणि रुग्णालयात दाखल न होता घरी उपचार घेतल्यास 30 हजार रुपयांपर्यंतचा दावाही दाखल करता येईल.त्याचबरोबर य रुग्णालयाच्या खर्चासाठी (Hospital Expenditure) 10 दिवस तुम्हाला प्रति दिन एक हजार रुपयेदेखील मिळतील.

कुटुंबाला वाहतुकीसाठी 25 हजार रुपयांपर्यंतचा खर्चदेखील मिळणार आहे. कोणत्याही कारणाने अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी 5 हजार रुपये व या विम्यांतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यतची रक्कम देण्यात येणार आहे.

योजनेचा कालावधी

या योजनेचा कालावधी हा एक वर्षाचा आहे. एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी तुमच्या जवळच्या कोणत्याही या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन विमा योजनेचे नूतनीकरण करावे लागेल.

असा करा अर्ज

तुम्हालाही या विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमचे इंडिया चार पोस्ट पेमेंट बँकेत चालू खाते असणे आवश्यक आहे. नसेल तर तुम्ही नव्याने खाते काढून या योजनेचा लाभधारक होऊ शकता.

299 व 399 च्या योजनेतील फरक काय

तशा या दोन्ही योजना सारख्याच आहेत. तरी त्यामध्ये काही मूलभूत फरक आहे. 399 च्या योजनेत विमाधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर दोन मुलांना 1 लाखांपर्यंतची मदत ही शिक्षणासाठी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अपघातानंतर दवाखान्यात येण्या जाण्यासाठी कुटुंबीयांना 10 दिवसांपर्यंत प्रतिदिन 1 हजार रुपये मिळतील. तसेच 25 हजार रुपये वाहतूक खर्च व मृत्यूनंतर 5 हजार अंत्यसंस्कार खर्च मिळेल, पण हे 299च्या योजनेला शिक्षण खर्च, प्रतिदिन 1 हजार, वाहतूक खर्च 25 हजार व अंत्यसंस्कार खर्च 5000 लागू नाहीत.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close