विशेष

PMJDY रिकाम्या बँक खात्यातूनही काढू शकतात 10 हजार रुपये ! जनधन खात्याचे हे आहेत फायदे

PMJDY रिकाम्या बँक खात्यातूनही काढू शकतात 10 हजार रुपये ! जनधन खात्याचे हे आहेत फायदे

प्रधानमंत्री जन धन योजनेला (PMJDY – Pradhan Mantri Jan Dhan Yojana) आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेद्वारे देशातील गरीब घटकांना मुख्य बँकिंग प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे.

या योजनेअंतर्गत लाखो गरीब कुटुंबांची बँकांमध्ये खाती उघडण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 46.25 कोटी लोकांची खाती उघडण्यात आली आहेत. त्यामुळं गावाखेड्यातील अनेक लोकांनी बँकामध्ये आपली खाती उघडली आहेत. अनेक वर्षांपासून ज्या लोकांचा आणि बँकांचा दूर दूरपर्यंत संबधही नव्हता, असे अनेक नागरिक प्रधानमंत्री जन धन योजनेच्या माध्यमातून बँकाशी जोडले गेले.

पंतप्रधान जन धन योजनेतील उपलब्ध सुविधा-

1. बचत खात्यातील सर्व प्रौढ खातेधारकांना 10 हजार रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जात आहे.
2. योजनेअंतर्गत निश्चित केलेली कमाल वयोमर्यादा 60 वरून 65 वर्षे करण्यात आली आहे.
3. 2000 रुपयांपर्यंत बिनशर्त ओव्हरड्राफ्टला परवानगी आहे.
4. रुपे कार्ड विमा: प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत दिलेल्या रुपे कार्डवर मोफत अपघात विमा संरक्षण दिलं जात आहे, 28 ऑगस्ट 2018 नंतर खातेधारकांसाठी अपघात विमा संरक्षण 1 लाख वरून 2 लाख करण्यात आलं आहे.
5. 15 ऑगस्ट 2014 ते 31 जानेवारी 2015 दरम्यान उघडलेल्या खात्यांच्या खातेधारकांना 30,000 रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिलं जात आहे, तर 1 लाख रुपयांपर्यंतचे अपघात विमा संरक्षण दिलं जात आहे.
6. योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यांमध्ये दोन वर्षांपर्यंत कोणताही व्यवहार न झाल्यास खाते निष्क्रिय मानले जाईल.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close