नौकरी

IAF भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती सुरू ! दहावी बारावी उत्तीर्ण आजच करा अर्ज

IAF भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती सुरू ! दहावी बारावी उत्तीर्ण आजच करा अर्ज

अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय हवाई दलात (Indian Air Force) नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना आता सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आली आहे.

■ भारतीय हवाई दलाने ‘अग्निवीर वायू भरती प्रक्रिया-2022’ (IAF Agniveer Vayu Recruitment 2022) साठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक असलेले पात्र उमेदवार विविध पदांसाठी भारतीय हवाई दलाच्या careerindianairforce.cdac.in आणि agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाईटना भेट देऊन अर्ज करू शकतात.

■ खालील पदांसाठी आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. इच्छुक उमेदवार https://careerindianairforce.cdac.in/assets/joining या लिंकला क्लिक करून अधिकृत नोटिफिकेशन (Notification) तपासून पाहू शकतात.

■ अग्निवीर वायू भरती प्रक्रिया-2022 अंतर्गत अनेक पदांची भरती केली जाणार आहे. अर्ज करण्यासंबंधी महत्त्वाच्या तारखा अग्निवीर वायू भरती प्रक्रिया-2022 साठी ऑनलाइन अर्ज भरण्यास 24 जून 2022 पासून सुरूवात होणार आहेत. तर उमेदवार 05 जुलै 2022 या तारखेपर्यंत ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करू शकतात. अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या अटी व शर्थीनुसार उमेदवारांची पात्रता असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा:- अग्निवीर वायू भरती प्रक्रिया – 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना वयोमर्यादेची अट असणार आहे. यात 29 डिसेंबर 1999 आणि 29 जून 2005 या यादरम्यान जन्मतारीख असलेले उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत.

पगार व लाभ:- नोकरी मिळाल्यानंतर उमेदवारांना

1.पहिल्या वर्षी दरमहा 30,000 रुपये पगार असेल. त्यात 21,000 रुपये इनहँड पगार (In hand Salary ) तर दरमहा 9,000 रुपये भारत सरकारच्या कॉर्पस फंडमध्ये (Corpus Fund) जमा होईल.

2.दुसऱ्या वर्षी पगार दरमहा 33,000 रुपयांवर जाईल. त्यात 23,100 रुपये हातात मिळतील. तर 9,900 कॉर्पस फंडमध्ये जातील.

3.तिसऱ्या वर्षी पगार दरमहा 36,500 असेल.यातील 25,550 रुपये हातात मिळतील आणि 10,950 रुपये कॉर्पस फंडमध्ये जाणार आहेत.

4.चौथ्या वर्षी मासिक पगार दरमहा 40,000 रुपये असणार आहे. यातील 28,000 रुपयांची रक्कम हाती मिळेल आणि दरमहा 12,000 रुपये कॉर्पस फंडमध्ये जमा होणार आहेत.

परीक्षा शुल्क:- या भरती प्रकियेत सहभागी होण्यासाठी परीक्षा द्यावी लागणार आहे.यासाठी 250 रुपये शुल्क ऑनलाईन अर्ज सादर करताना भरावं लागेल. डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून परीक्षा शुल्क भरण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

■ अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडे वापरात असलेला मोबाइल क्रमांक आणि वैध ई-मेल आयडी असणं अनिवार्य आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ऑनलाइन पद्धतीनेच परीक्षेचं प्रवेश पत्र (Admit Card) मिळेल.त्याची कलर प्रिंट काढून ती परीक्षेवेळी सोबत ठेवणं गरजेचं आहे.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close