विशेषतंत्रज्ञान

Surya Nutan अरे वा ! आता तीन वेळचे जेवण बनेल मोफत 10 वर्ष चालणार ही चूल ! सरकारही देणार सबसिडी

Surya Nutan अरे वा ! आता तीन वेळचे जेवण बनेल मोफत 10 वर्ष चालणार ही चूल ! सरकारही देणार सबसिडी

Surya Nutan Solar :- घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) दरात सातत्यानं वाढ होत असल्याने आता रोजचा स्वयंपाक करणं महाग झालं आहे.

■ गॅसच्या किमती वाढल्यानं सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या स्थितीच्या पार्श्वभूमीवर आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने एलपीजी (LPG) सिलिंडरला पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आयओसीनं घरात वापरण्यासाठी सोलर अर्थात सौर शेगडी (Solar Gas) लॉंच केली आहे. या शेगडीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ती तुम्हाला रात्रीच्या वेळीही वापरता येणार आहे.

■ घराबाहेर लावलेल्या पॅनेल्समध्ये साठवलेली सौरऊर्जा (Solar Energy) ही शेगडी वापरते. यामुळे तुम्हाला दिवसातून तीन वेळा अगदी ऊन नसतानाही अन्न मोफत शिजवता येणार आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या निवासस्थानी आयोजित एका कार्यक्रमात या सौर शेगडीवर शिजवलेले अन्नपदार्थ वाटण्यात आले. शेगडीच्या खर्चाव्यतिरिक्त यासाठी कोणताही देखभाल खर्च येत नाही.

■ पारंपरिक इंधनाला पर्याय म्हणून याकडे पाहिलं जात आहे, असं पुरी यांनी या वेळी सांगितलं. फरीदाबादमधल्या `आयओसी`च्या संशोधन आणि विकास विभागानं ही सौर शेगडी विकसित केली आहे.

सूर्यप्रकाशात ठेवायची गरज नाही ‘आयओसी’चे संचालक (आर अ‍ॅंड डी) एस. एस.व्ही रामकुमार यांनी सांगितलं या शेगडीला सूर्या नूतन असं नाव देण्यात आलं आहे. ही शेगडी सौर कुकरपेक्षा वेगळी आहे. कारण ती सूर्यप्रकाशात ठेवावी लागत नाही. चार सदस्य असलेल्या कुटुंबाचं तीन वेळचं जेवण सूर्या नूतन (Surya Nutan) शेगडीवर सहज बनू शकतं.

असं करते काम सूर्या नूतन शेगडी सूर्यप्रकाशात ठेवण्याची गरज नाही.ही शेगडी घराच्या छतावर लावलेल्या सौर प्लेटशी एका केबलच्या माध्यमातून जोडलेली असतो. सौर प्लेटद्वारे निर्माण होणारी ऊर्जा केबलच्या माध्यमातून शेगडीपर्यंत येते. सौर प्लेट सौर ऊर्जा प्रथम थर्मल बॅटरीत साठवते. त्यामुळे या शेगडीवर तुम्ही रात्रीच्या वेळीदेखील जेवण बनवू शकता.

किंमत किती असेल :- किंमत असेल खूप कमी आयओसीनं सू्र्या नूतन शेगडीचं प्रारंभिक मॉडेल सादर केलं आहे. कमर्शिअल मॉडेल अद्याप लॉंच झालेलं नाही. देशातल्या 60 ठिकाणी या शेगडीची चाचणी करण्यात आली आहे. आयओसीनं दिलेल्या माहितीनुसार, सूर्या नूतनची किंमत 18 हजार ते 30 हजार रुपयांदरम्यान असेल. यावर सरकार अनुदानदेखील देईल. अनुदान मिळाल्यावर या शेगडीची किंमत 10,000 ते 12,000 रुपयांदरम्यान असू शकेल. ही शेगडी 10 वर्षं काम करू शकेल, असंही सांगण्यात आलं.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close