राज्यविशेष

रेशन कार्ड मध्ये मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे ! ही आहे सोप्पी प्रोसेस

 

रेशन कार्ड मध्ये मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे ! ही आहे सोप्पी प्रोसेस

◆ मोबाईल नंबर अपडेट केल्याचे फायदे

◆ रेशन कार्ड आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. आता रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करणे खूप सोपे झाले आहे. हे तुम्ही घरी बसून सहज करू शकता. वास्तविक, जर तुमच्या रेशनकार्डमध्ये जुना मोबाईल क्रमांक टाकला असेल, तर तुम्हाला रेशनशी संबंधित अपडेट मिळू शकणार नाहीत. अनेक महत्त्वाचे अपडेट्स विभागाकडून कार्डधारकांना संदेशाद्वारे पाठवले जातात.त्यामुळे आजच तुमचा मोबाइलला नंबर रेशन कार्ड ला अपडेट करा.

◆ असे करा रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करा

1. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम https://nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx या वेबसाइटला भेट द्या.
2. तुमच्या समोर एक पेज उघडेल. येथे तुम्हाला Update Your Registered Mobile Number असे लिहिलेले दिसेल.
3. आता खाली दिलेल्या कॉलममध्ये तुमची माहिती भरा.
5. येथे पहिल्या रकान्यात, Aadhaar Number of Head of Household/NFS ID क्रमांक लिहा.
6. दुसऱ्या रकान्यात शिधापत्रिका क्रमांक लिहा.
7. तिसर्‍या स्तंभात घरप्रमुखाचे नाव लिहा.
8. शेवटच्या रकान्यात तुमचा नवीन मोबाईल नंबर टाका आणि सेव्ह करा.
9. आता तुमचा मोबाईल नंबर अपडेट केला जाईल.

◆ हे ही वाचा सरकारने ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ सुरू केले

◆ 1 जून 2020 पासून देशातील 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रेशन कार्ड पोर्टेबिलिटी सेवा ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही राज्यात राहून रेशन खरेदी करू शकता.

◆ ही योजना आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड, त्रिपुरा, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि दमण-दीवमध्ये आधीच लागू आहे.

🤳 सर्व महत्वाचे अपडेट मिळवा तुमच्या व्हाट्सअप्प वर आजच जॉईन करा लोकमाझा डिजिटल मॅगझीन👉 https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close