देशराज्यविशेष

काय आहेत ई-श्रम कार्ड चे फायदे , असा करा अर्ज जाणून घ्या अधिक

 

काय आहेत ई-श्रम कार्ड चे फायदे , असा करा अर्ज जाणून घ्या अधिक

◆ ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्याचे फायदे

18 ते 40 वयोगटातील कोणताही असंघटीत क्षेत्रातील व्यक्ती हा ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करू शकतो. ज्या कामगाराने ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे. अशा कामगाराचा मृत्यू झाल्यास अथवा तो कायमस्वरूपी अपंग झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाखांची मदत देण्यात येते.

तसेच तो जर जखमी झाला तर त्याच्या कुटुंबाला एक लाखांचा मोबदला मिळतो. ई-श्रम पोर्टवर नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, आणि बँक खाते क्रमांक या दोन महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असते.

◆ अशी आहे रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत

तुम्हाला सर्वप्रथम पोर्टल https://www.eshram.gov.in/ वर जाव लागेल. रजिस्ट्रेशनसाठी आधार नंबर टाकताच तेथील डाटा बेसवरून कामगाराची सर्व माहिती आपोआप पोर्टवर दिसेल. व्यक्तीला आपल्या बँकेच्या माहितीसह मोबाइल नंबरसह दुसरी सर्व माहिती भरावी लागेल. हा ऑनलाइन फॉर्म नंतर अपडेटसुद्धा करता येऊ शकतो.

◆ अधिक महिती साठी टोल फ्री नंबर वर संपर्क करू शकतात

रजिस्ट्रेशनसाठी सरकारने 14434 टोल फ्री नंबरसुद्धा ठेवला आहे, जिथे योजनेसंबंधी सर्व माहिती घेता येऊ शकते. या पोर्टलद्वारे राज्य सरकार सुद्धा आपल्या कामगारांचे रजिस्ट्रेशन करू शकतात.

◆ जर तुम्हाला ई-श्रम कार्ड काढायचे असेल तर तुम्ही 7620722606 या नंबर वर कॉल करून तुमची माहिती देऊन ई-श्रम कार्ड काढून घेऊ शकता.

【 💯 आता WhatsApp वर मिळणार न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!अगदी विनामूल्य जॉईन करा लोकमाझा डिजिटल https://lokmajha.com 】

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close