राज्य

मतदान कार्ड नाहीये ! असे मागवा ऑनलाईन मतदान कार्ड जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

 

मतदान कार्ड नाहीये ! असे मागवा ऑनलाईन मतदान कार्ड जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

◆ 18 वर्षे पूर्ण झालेला भारतीय नागरिकाकडे मतदान ओळखपत्र असणे गरजेचे आहे. ऑनलाईन अर्जाच्या करण्याची सोय झाल्याने नागरिकांना सरकारी कार्यालयाच्या खेटा घालण्याचा मनस्ताप वाचणार आहे. तसेच वेळ आणि पैशांची ही बचत होणार आहे. चला तर जाणून घेऊयात कसा करावा मतदान ओळखपत्रासाठी ऑनलाईन त्यासाठी खालील स्टेप्स पहा

◆ ही आहे प्रोसेस

1.सर्वप्रथम https://nvsp.in/ या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुम्ही रजिस्टरेशन करणे गरजेचे आहे.

2.लॉगिन या पर्यायावर क्लिक केले की, ते तुम्हाला नवीन युजर आहात का असा प्रश्न विचारते. त्यावर क्लिक करा.

3.त्यानंतर तुमच्या समोर रजिस्ट्रेशनसाठी अर्ज येईल. त्यात तुमचे पुर्ण नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल आय-डी आणि अनुषंगिक माहिती भरा

4.ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला पासवर्ड तयार करावा लागेल. त्यानंतर रजिस्टर पर्याय निवडावा लागेल. तुमची नोंद झाल्यानंतर ई-मेल आयडी आणि पासवर्डद्वारे(Password) लॉगिन करा.

5.आता तुम्हाला Fresh Inclusion and Enrollement या पर्यायचा उपयोग करायचा आहे. त्यानंतर तुमचं नागरिकत्व निवडा. राज्य निवडा आणि पुढची प्रक्रिया पार करा.

6.या टप्प्यात तुमच्या स्क्रीनवर फॉर्म 6 उघडेल. त्यात तुमचं नाव, जन्मतारीख, पत्ता अशा महत्वाच्या बाबी तुम्हाला नोंद करायचा आहेत.

7.खाली दिलेले सबमिट बटणवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक मेल येईल. त्यात लिंक असेल. त्याद्वारे तुम्ही तुमच्या मतदान ओळखपत्राचे स्टेट्स पाहु शकता.

◆ तुमचं रजिस्ट्रेशन व्होटरकार्डसाठी…या अर्जानंतर तुमच्या पत्त्यावर मतदान ओळखपत्र घरपोच मिळेल.
➖➖➖➖➖➖➖➖
😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा 👉 https://lokmajha.com
➖➖➖➖➖➖➖➖
जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close