तंत्रज्ञानविशेष

एटीम कार्ड सारखे आधार कार्ड हवंय ! घर बसल्या असे मागवा जाणून घ्या प्रोसेस

 

एटीम कार्ड सारखे आधार कार्ड हवंय ! घर बसल्या असे मागवा जाणून घ्या प्रोसेस

◆ Aadhaar Card प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. या कागदपत्रांशिवाय अनेक काम रखडली जातात. याशिवाय नवीन सिमकार्ड घेतांना व बँकेत खाते उघडतांना आधार क्रमांक देणे देखील आवश्यक झाले आहे.

◆ नवीन आधार कार्ड पॉलिव्हिनिल क्लोराईड अर्थात पीव्हीसीकार्ड म्हणून मुद्रित केले जाणार आहे. आता आधारकार्ड देखील सहजपणे एटीएमप्रमाणे ठेवता येणार आहे.

◆ यूआयडीएआयच्या मते, नवीन आधार पीव्हीसी कार्ड्सच असणार आहे. आता आधारकार्ड बर्‍याचअंशी एटीएम कार्डांसारखे दिसेल असे म्हटले आहे.

◆ त्यामुळे पीव्हीसी कार्डवर आधार कार्ड प्रिंट करता येणार आहे. विशेष म्हणजे हे टिकाऊ असून दिसण्यासही आकर्षक आहे. होलोग्राम, गिलोच पॅटर्न, घोस्ट इमेज आणि मायक्रोटेक्स अशा नव्या वैशिष्ट्यांचे असणार आहे.

◆ असा करा ऑनलाईन अर्ज.

1.नवीन आधारसाठी यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईट (https://uidai.gov.in/) वर ऑनलाईन अर्ज करावा.

2. वेबसाईटच्या होम पेजवर, माझे आधारावर क्लिक करावे. येथे ऑर्डर बेस पीव्हीसी कार्डचा पर्याय निवडावा.

3.यानंतर, १२ अंकी आधारक्रमांक किंवा १६ अंकी व्हर्च्युअल आयडी नमूद करावा लागेल. यानंतर सुरक्षा कोड किंवा कॅप्चा कोड प्रविष्ट करा. कॅप्चा कोड प्रविष्ट केल्यानंतर, ओटीपीवर क्लिक करून तो मिळवणे आवश्यक आहे.

4.नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल. ओटीपी सबमिशन नंतर, पीव्हीसी कार्डचे पूर्वावलोकन समोर दिसेल. यानंतर पेमेंट पर्यायावर क्लिक करा.

5. आपण पेमेंट पर्यायावर क्लिक करताच एक नवीन पृष्ठ उघडेल. प्रक्रिया पूर्ण केल्यावर पीव्हीसी कार्डची नोंदणी होईल.

【 💯 आता WhatsApp वर मिळणार न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!अगदी विनामूल्य जॉईन करा लोकमाझा डिजिटल https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close