व्यवसाय

Tissue Paper Business Idea कमी खर्चात सुरू करा हा व्यवसाय लाखों रुपयांची होईल कमाई

Tissue Paper Business Idea कमी खर्चात सुरू करा हा व्यवसाय लाखों रुपयांची होईल कमाई

आपल्याला व्यवसाय करायचा असतो, पण तो नेमका कोणता? याबाबत, काही निश्चित होत नाही, सध्या अनेक व्यवसाय उपलब्ध होत आहेत की, ज्यातून मोठी कमाई होऊ शकते.

Tissue Paper Business Idea:- देशात `टिश्यू पेपर’ (Tissue Paper) म्हणजेच पेपर नॅपकिनचा वापर सातत्याने वाढत चालला आहे. त्यामुळे त्याची मोठी बाजारपेठ तयार झाली आहे. पेपर नॅपकिन तयार करण्याचा व्यवसाय करायचा झाल्यास, एका मशीनची आवश्यकता असते, की ज्याची किंमत सुमारे 4 ते 5 लाख रुपये आहे. या व्यवसायातून पहिल्या वर्षीच 10-12 लाख रुपयांचा नफा (Income) कमवणं शक्य आहे.

हॉटेल्स, ढाबे, रेस्टॉरंट, शाळा-कॉलेज, हॉस्पिटल्स (Hospitals) अशा सगळीकडे आपण पाहत असू, टिश्यू पेपर हमखास वापरला जातो, ती एक गरज झाली असंच म्हणावं लागेल. त्यामुळे हा व्यवसाय चांगला चालणारा आणि कमाई करून देणारा ठरू शकतो. एखादा नॅपकिन पेपर प्लांट (Napkin Paper Plant) उभा केल्यास तो फायद्याचा ठरेल आणि अधिक व्यवसाय वाढवण्यास मदत मिळेल. हॉटेल, रेस्टॉरंट, हॉस्पिटल यांना हे नॅपकिन विकून लाखो रुपये सहज कमावता येतील.

कसा करता येईल हा व्यवसाय जाणून घ्या सविस्तर

येईल देशात टिश्यू पेपरची बाजारपेठ सातत्याने वाढत आहे. बाजारात केवळ ब्रँडेडच नाही तर स्थानिक नॅपकिन्सनाही चांगली मागणी आहे. कारण ब्रँडेडपेक्षा कमी किमतीत हे नॅपकिन घेणं व्यवसायिकालाही फायद्याचं ठरतं, त्यामुळे यात जम बसवता येईल.

या व्यवसायासाठी हे मशीन आहे आवश्यक

नॅपकिन पेपर बनवणारी मशीन्स 4-5 लाख रुपये किंवा त्याहून अधिक किमतीत उपलब्ध आहेत. जर तुम्ही सेमी ऑटोमॅटिक मशिन खरेदी केलं तर ते 5 लाख रुपयांपर्यंत मिळेल. हे मशीन दर तासाला 4-5 इंच आकाराच्या नॅपकिन पेपरचे 100 ते 500 तुकडे तयार करू शकतं. जर हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करायचा असेल, तर उच्च क्षमतेचं स्वयंचलित मशीन घ्यावं लागेल जे 10-11 लाख रुपयांना मिळेल.त्याची क्षमता दर तासाला 2,500 रोल्स बनवण्याची आहे.

मुद्रा योजनेतून मिळेल कर्ज :

टिश्यू पेपरचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जही मिळतं. यासाठी 3.50 लाख रुपये जमा केल्यास केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेंतर्गत कर्ज मिळू शकतं. या योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करून 3.10 लाख रुपयांचे `मुदत कर्ज’ (Term Loan) व 5.30 लाख रुपयांचे खेळतं भांडवल कर्ज (Playing capital debt) मिळू शकतं.

व्यवसायातून कमाई किती होईल:

हा व्यवसाय सुरू करताना जर छोटा प्लांट उभारला तर एका वर्षात तुम्ही 1.5 लाख किलो नॅपकिन पेपर सहज तयार करू शकता. तो बाजारात 60 ते 65 रुपये किलो दराने विकला जाऊ शकतो. मशिनची किंमत, कच्चा माल (Raw Material), कर्जाचे हप्ते, मजुरी आदी वजा करूनही पहिल्या वर्षी 10-12 लाख रुपये कमाई होऊ शकते.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close