ब्रेकिंग न्युजराज्य

SSC Exam दहावी बोर्डाचा ऑनलाईन अर्ज आजपासून भरता येणार

 

👨‍💻 आजपासून दहावी बोर्डाचा परिक्षेचा ऑनलाईन अर्ज भरता येणार

✍️ वर्ष 2022 मध्ये घेण्यात येणाऱया दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया उद्या 18 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. नियमित शुल्कासह पहिल्यांदात परीक्षेला बसणारे विद्यार्थी 9 डिसेंबरपर्यंत परीक्षा अर्ज सादर करू शकतात.

💰या मुदतीनंतर अर्ज करणाऱया विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत 20 ते 28 डिसेंबरपर्यंत आहे.

👨‍💻 विद्यार्थ्यांनी शाळांमार्फत मंडळाच्या www.mahahsscboard.in या वेबसाईटवर परीक्षा अर्ज पाठवायचे आहेत, अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिल्या आहेत.

💁🏻‍♂️वर्ष 2022 मधील परीक्षेसाठी नोव्हेंबर-डिसेंबर 2020, सन 2021 अथवा सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसुधार योजनेतंर्गत परीक्षा अर्ज भरता येणार आहे.

【 💯 आता WhatsApp वर मिळणार न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!अगदी विनामूल्य जॉईन करा लोकमाझा डिजिटल https://lokmajha.com 】

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close