व्यवसाय

Amul Franchise व्यवसाय करायचा विचार करताय ! प्रचंड मागणी असणारी अमूल ची फ्रँचायझी देईल मजबूत पैसे

Amul Franchise व्यवसाय करायचा विचार करताय ! प्रचंड मागणी असणारी अमूल ची फ्रँचायझी देईल मजबूत पैसे

Amul Franchise:- आपल्यापैकी अनेक तरुण मंडळी नोकरी पेक्षा स्वतःचा व्यवसाय चांगला या विचाराने उद्योजक होण्याचे स्वप्न पाहतात. मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारी मेहनत फार असते. पाहिले तर स्वतः चा व्यवसाय सुरू करायचा म्हणजे हातात भांडवल लागतं. भांडवल नसल्याने अनेक व्यक्ती हा मार्ग स्वीकारत नाहीत.

तर आता जर तुम्हाला देखील व्यवसाय करायची इच्छा असेल तर तुम्ही अमुल कंपनीच्या सहाय्याने तो सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला नेमक्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता असेल. तसेच यात किती नफा मिळेल या सर्वच गोष्टींची माहिती आज जाणून घेऊ.

किती रक्कम गुंतवावी लागेल ?

अमुल कंपनीबरोबर काम करायचे असेल तर सर्वात आधी तुम्हाला एक 100 चौरस फूट जागा घेणे गरजेचे आहे. यात अमुल कंपनीच्या सर्व पदार्थांच्या मशीन बसवल्या जातील. या मशीन अमुल कंपनीच देते. त्यासाठी तुम्हाला 2 ते 5 लाख रुपये खर्च करावे लागतात. हे पैसे फक्त अमुलच्या फॉर्मेटनुसार आउटलेटवर आणि इतर उपकरणे बसनव्यात वापरले जातात. यातून तुम्ही अमुलाची फ्रँचायझी विकत घेता.

कमाई कशी होईल ?

अमुल फ्रँचायझीला तुम्हाला 25 हजार रुपये सुरक्षितता म्हणून जमा करावे लागतील. यात मार्जीन नुसार किरकोळ नफा होईल. अमुल मार्फत तुमच्या आउटलेटवर प्रॉडक्ट पाठवण्यात येते. मार्जिन उत्पादनानुसार किरकोळ बदलते आणि पूर्णतः ती बदलायची की नाही हे पार्लर मालकावर अवलंबून आहे. यातील दुधाच्या पिशवीवर 2.5 टक्के मार्जिन आहे. तर आईसक्रीमवर 20 टक्के आणि इतर दुग्धजन्य पदार्थांवर 10 टक्के. त्यामुळे तुमचे पार्लर सुरू झाल्यावर तुम्ही तुमच्या सोईने पदार्थ विकून बक्कळ नफा कमवू शकता

असा साधा संपर्क

सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत तुम्ही दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
संपर्क क्रमांक – 022-68526666

अमुल कंपनीची ही फ्रँचायझी तुम्हाला उत्तम मार्जिन देते. त्यात अधिक नफा कमवून तुम्ही आणखीन काही ठिकाणी याचा व्यवसाय सुरू करू शकता. कोणताही व्यवसाय करत असताना सुरुवात छोट्या पायरीपासूनच होते. त्यामुळे ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close