विशेष

Solar Panel Subsidy घरावर सोलर पॅनल बसवा मोफत विजेचा आनंद घ्या सरकार कडून मिळेल अनुदान येथे करा अर्ज

Solar Panel Subsidy घरावर सोलर पॅनल बसवा मोफत विजेचा आनंद घ्या सरकार कडून मिळेल अनुदान येथे करा अर्ज

विजेचे उत्पादन कमी व मागणी जास्त वाढल्याने वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. परंतु तुम्ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून या वीज संकटावर सहज मात करू शकता. तुम्ही तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवून (Solar Panel) त्याच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने विजेची निर्मिती करू शकता. सोलर पॅनलपासून निर्माण होणारी ही वीज तुमची गरज पूर्ण करू शकते. सरकारकडून देखील सोलर पॅनल बसवण्यासाठी मदत (Solar Subsidy) केली जात आहे.

केंद्र सरकारकडून अनुदान

सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या डीलरकडून सोलर पॅनल खरेदी करून ते तुमच्या घरावर बसवा. त्यानंतर अनुदानासाठी अर्ज करा. तुम्ही जर तुमच्या घरावर तीन किलोवॅटचे सोलर पॅनल बसवले तर तुम्हाला सरकार चाळीस टक्क्यांपर्यंत अनुदान देते. तुम्ही जर तुमच्या घरावर दहा किलोवॅटचे सोलर पॅनल बसवले तर तुम्हाला त्यावर वीस टक्के सबसीडी देण्यात येते.

सोलर पॅनलसाठी किती खर्च येतो

जर तुम्ही तुमच्या घरावर दोन किलोवॅटचे सोलर पॅनल बसू इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला एक लाख वीस हजारांच्या जवळपास खर्च येतो. मात्र त्यावर तुम्हाला चाळीस टक्क्यांपर्यंत सबसीडी मिळते. म्हणजेच तुम्हाला दोन किलो वॅटच्या सोलर सिस्टीमसाठी अनुदान वगळता एकूण 72 हजार रुपयांचा खर्च येतो. एकदा तुम्ही तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवले तर पुढील 25 वर्ष तुमची वीजबिलापासून सुटका होऊ शकते. तसेच तुमच्या घरात चोवीस तास वीज उपलब्ध होऊ शकते.

असा करा सोलर पॅनल अनुदानासाठी अर्ज ?

तुम्ही तुमच्या घरावर सोलर पॅन लावल्यानंतर अनुदानासाठी https://solarrooftop.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तिथे अप्लाय फॉर सोलर पॅनल या पर्यावर क्लिक करा. तिथे एक नवीन पेज ओपन हेईल. या पेजमध्ये तुमच्या सोलर पॅनलबाबत आवश्यक ती माहिती भरा. तुम्ही अर्ज केल्यानंतर महिना भराच्या आत तुमचे अनुदान बँकेत जमा होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close