विशेष

Ayushman Bharat card आयुष्यमान कार्डावर मिळेल पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार ! येथे करा अर्ज

Ayushman Bharat card आयुष्यमान कार्डावर मिळेल पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार ! येथे करा अर्ज

आयुष्यमान भारत ही एक योजना आहे. ( Ayushman Bharat card ) या योजनेस पात्र ठरणार्‍या नागरिकांवर पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार होतात. जाणून घेवूया या योजनेसाठीची पात्रता आणि कार्ड मिळण्‍याच्‍या प्रक्रियेविषयी

◆ काय आहेत योजनेस पात्र ठरण्‍याच्‍या अटी…

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अटी : संबंधित कुटुंबाचे पक्‍के घर नसावे, कुटुंबातील प्रमुख महिला असावी, एक व्‍यक्‍ती दिव्‍यांग असेल तर, अनुसूचित जाती/जमातीमधील व्‍यक्‍ती, भूमिहिनी व्‍यक्‍ती, बेघर व्‍यक्‍ती, वेठबिगार मजूर, आदिवासी आदी या योजनेसाठी पात्र ठरतात.

शहरी भागातील नागरिकांसाठी अटी : फिरस्‍ते, कचरा वेचक, घरकाम करणारे, छोटे दुकानदार, शिवणकाम करणारे, फेरीवाले, रस्‍त्‍यावर काम करणारे, बांधकामांवर काम करणारे मजूर, फ्‍लंबर, मिस्‍त्री, पेंटर, वेल्‍डर, सुरक्षा रक्षक, हमाल व सफाई कर्मचारी, मोल मजूरी करणारे, चालक, रिक्षा चालक, दुकानात काम करणारे आदी या योजनेस पात्र ठरतात.

Ayushman Bharat card : कसा कराल अर्ज ?

आयुष्‍यमान कार्डसाठी तुम्‍ही पात्र असाल तर कार्डसाठी तुम्‍ही ऑनलाईन किंवा तुमच्‍याजवळ असणार्‍या जनसेवा केंद्रावर जावून अर्ज सादर करु शकता. हा अर्ज करताना आधार कार्ड, रहिवासी दाखला, रेशन कार्ड आणि कुटुंबातील एकाचा एक मोबाईल फोन नंबर असणे आवश्‍यक आहे.

ग्रामीण भागात अनेकदा मोबाईलचे नेटवर्क मिळत नाही. ही शक्यता लक्षात घेता मोबाईलचे नेटवर्क मिळाले नाही तर आधारशीही हेल्थ कार्ड लिंक करता येते. मोबाईल नंबर रजिस्टर केल्यानंतर मिळालेला ओटीपी क्रमांक भरावा लागेल. त्यानंतर सुविधा केंद्रात बायोमेट्रिक प्रमाणिकरण केल्यानंतर तुम्हाला तुमचे हेल्थ आयडी मिळेल.

https://mera.pmjay.gov.in/search/login .

अथवा .
https://aapkedwarayushman.pmjay.gov.in/AapkeDwar/

◆ या वेबसाईटवर लॉगिन करा अथवा .
14555 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा आणि आपणरील योजनेचे लाभार्थी आहात की नाही हे तपासून बघा!

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3Nfu6ge
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close