Uncategorizedदेशराज्य

केंद्र सरकारची मोठी घोषणा देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार डिजिटल हेल्थ कार्ड

 

◆ देशातील प्रत्येक नागरिकाला आता ‘युनिक हेल्थ कार्ड’ मिळणार आहे. केंद्र सरकारने देशवासियांना या नव्या योजनेची खूशखबर दिली असून पुढील आठवडय़ापासून योजनेची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.

◆ या आयडीमध्ये त्या व्यक्तीचे संपूर्ण आरोग्य रेकॉर्ड असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी, 27 सप्टेंबरला ‘प्रधानमंत्री डिजिटल हेल्थ मिशन’ लॉन्च करणार आहेत.

◆ केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी या ‘युनिक हेल्थ कार्ड’च्या योजनेची माहिती दिली. देशातील आरोग्य सेवा बळकट करणे हा योजनेमागील हेतू आहे. नागरिक आधार कार्ड किंवा मोबाईल नंबरच्या मदतीने ‘युनिक हेल्थ कार्ड’ मिळवू शकणार आहेत.

◆ या कार्डमुळे नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी विविध रुग्णालये तसेच आरोग्य केंद्रांपर्यंत वेळीच पोहोचणे सोपे बनणार आहे. कार्डधारकाच्या प्रकृतीचा सर्व रेकॉर्डही ठेवला जाईल.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close