विशेष

विक्रेत्याने MRP पेक्षा जास्त पैसे घेतले ! तर येथे करू शकतात तक्रार हा आहे टोल फ्री नंबर

विक्रेत्याने MRP पेक्षा जास्त पैसे घेतले ! तर येथे करू शकतात तक्रार हा आहे टोल फ्री नंबर

◆ बऱ्याचदा दुकानदार आपल्याला ( MRP) एमआरपीपेक्षा जास्त दराने वस्तू विकतात. साधी पाण्याची बाटली किंवा दुधाची पिशवी घ्यायची म्हटली तरी फ्रिजचे पैसे म्हणून अतिरिक्त पैसे आकारले जातात. दोन-तीन रुपये म्हणूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण अशा बऱ्याच वस्तूंच्या मागे आपली फसवणूक होऊ शकते.

◆ अशा वेळी ग्राहकांनाही काही हक्क आहेत. विक्रेते आणि ग्राहक यांच्यासाठीही काही नियम, कायदे, अटी आहेत. त्यानुसारच वस्तूंची खरेदी-विक्री होते. काही वस्तूंच्या किमती ठरलेल्या असतात.

◆ ज्या त्या वस्तूवरच दिलेल्या असतात. याला एमआरपी म्हटलं जातं. एमआरपीनुसार सर्व ठिकाणी त्या वस्तूंचे दर सारखेच असतात. कोणताही दुकानदार त्या वस्तूंवर एमआरपीपेक्षा जादा पैसे आकारू शकत नाही.

◆ जर विक्रेते एमआरपीपेक्षा जास्त दराने वस्तू देत असतील. तर ग्राहकांना तक्रार करता येऊ शकते. आता एमआरपीपेक्षा आपल्याकडून जास्त पैसे घेत असतील तर नेमकं काय करायचं? तक्रार करायची झाल्यास ती कुठे आणि कशी करायची?

◆ कोणत्याही दुकानदाराला MRP पेक्षा जास्त पैसे आकारण्याचा अधिकार नाही. जर एखाद्या दुकानदाराने तुमची फसवणूक केली किंवा एखादा व्यापारी तुम्हाला महागड्या किमतीत वस्तू विकत असेल तर तुम्ही 8130009809 या क्रमांकावर एसएमएस करून तक्रार करू शकता.

◆ तुम्ही टोल फ्री ग्राहक हेल्पलाइन नंबरवरही तक्रार नोंदवू शकता. तुमची तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही 1800-11-4000 किंवा 14404 वर कॉल करू शकता. एसएमएस प्रमाणेच तुमची तक्रार येथे नोंदवली जाईल आणि त्याचे संभाव्य उपाय किंवा तुम्हाला पुढे काय करायचे आहे. ही माहिती दिली जाईल तुम्ही http://consumerhelpline.gov.in/ पोर्टलवर तुमची नोंदणी करू शकता आणि तुमची तक्रार नोंदवू शकता. येथे तुम्ही तुमची तक्रार माहिती, कंपनीचे नाव आणि विवाद संबंधित कागदपत्रे देखील संलग्न करू शकता

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close