व्यवसाय

Business Idea कोणत्याही गुंतवणुकीशीवाय आधार कार्डची फ्रँचायजी घ्या आणि दरमहिना लाखो रुपये कमवा

Business Idea कोणत्याही गुंतवणुकीशीवाय आधार कार्डची फ्रँचायजी घ्या आणि दरमहिना लाखो रुपये कमवा

Business Idea तुम्हालाही गुंतवणूक न करता स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तुम्ही कोणत्याही गुंतवणूकीशिवाय दरमहा लाखोंची कमाई करू शकता.

सरकारी कंपन्यांची फ्रँचायजी उघडून तुम्ही स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकता. आपल्याला या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही आणि नफा देखील चांगला आहे. तसेच नुकसान होण्याची शक्यताही नगण्य आहे. सरकारी फ्रँचाइझींसोबत काम करण्याची मजा वेगळी असून कमाईही बंपर आहे.

आधार कार्ड फ्रेंचाइजी

आजकाल देशात राहणाऱ्या प्रत्येकासाठी आधार कार्ड हा महत्त्वाचा दस्तावेज आहे. यामुळे याला खूप मागणी असते. तुम्ही आधार कार्ड फ्रँचायझी घेऊ शकता. यामुळे तुम्ही खूप चांगली कमाई करू शकाल. तुम्हाला आधार कार्डची फ्रँचायजी करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला आधी यूआयडीएआयने घेतलेल्या परीक्षेत पास व्हावं लागेल.

यानंतर सर्व्हिस सेंटर उघडण्याचा परवाना दिला जातो. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आधार नोंदणी क्रमांक आणि बायोमेट्रिक पडताळणी करून घ्यावी लागते. यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटरमधून नोंदणी करावी लागणार आहे. अशावेळी आधार कार्ड अत्यंत काळजीपूर्वक ठेवावे लागते. तसेच यात काही चूक झाली तर ती दुरुस्त करून घेण्यासाठी तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा यूआयडीएआय फ्रँचाइझीमध्ये जाऊ शकता. तुम्ही आधार कार्ड फ्रँचायजीही घेऊ शकता.

अर्ज कसा करावा ते जाणून घ्या:

1. आधार फ्रेंचायझी परवाना मिळवण्यासाठी सर्वात आधी एनएसईआयटी https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

2. येथे तुम्हाला ‘क्रिएट न्यूज युजर’चा पर्याय मिळेल.

3. यामध्ये तुम्हाला ‘एण्टर शेअर कोड’ असं विचारलं जाणार आहे. ‘शेअर कोड’साठी https://resident.uidai.gov.in/offline-kyc जाऊन ऑफलाइन ई-आधार डाऊनलोड करावा लागतो.

4. डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही ‘एक्सएमएल फाइल’ आणि ‘शेअर कोड’ दोन्ही डाऊनलोड कराल.

5. अर्ज करताना तुमच्या स्क्रीनमध्ये एक फॉर्म ओपन होईल. त्यात जी काही माहिती मागितली आहे ती भरून ती सबमिट करा.

6. तुमच्या फोन आणि ई-मेल आयडीवर ‘युजर आयडी’ आणि ‘पासवर्ड’ दिसेल. आता या आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून तुम्ही ‘आधार टेस्टिंग अँड सर्टिफिकेशन’च्या पोर्टलवर सहज लॉग इन करू शकता. यानंतर ‘कंटिन्यू’चा पर्याय तुमच्यासमोर येईल, त्यावर क्लिक करा.

7. पुढच्या चरणात तुमच्यासमोर पुन्हा एक फॉर्म उघडेल. मागितलेली संपूर्ण माहिती भरा. त्यानंतर तुमचा फोटो आणि डिजिटल सिग्नेचर अपलोड करा. यानंतर पुन्हा तुम्ही सर्व माहिती योग्य प्रकारे भरली आहे की नाही हे तपासून पाहा, त्यानंतर ‘प्रोसीड टू सबमिट फॉर्म’वर क्लिक करून पुढे जा.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close