Uncategorized

ब्रेकिंग दहावी बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर या दिवशी होणार पेपर

 

ब्रेकिंग दहावी बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर या दिवशी होणार पेपर

◆ शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या परीक्षा आणि तारखांबाबत अनिश्चितता व्यक्त होत होती.

◆ तसेच, ओमिक्रॉनच्या संकटामुळे संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता तारखा जाहीर झाल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा सर्वांचाच जीव भांड्यात पडला आहे.

◆ मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक आम्ही जाहीर करत आहोत.

◆ इयत्ता १२वीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ यादरम्यान तर, इयत्ता १०वीची लेखीपरीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ याकालावधीत प्रचलित पद्धतीने (ऑफलाईन) होतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच अभ्यासक्रमात २५ % कपात करण्यात आली आहे. उर्वरित अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील.

◆ प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांची परीक्षा (प्रचलित पद्धतीनुसार) बारावी,दहावीसाठी अनुक्रमे १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ आणि २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ याकालावधीत पार पडेल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळ परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक जाहीर करेल.

◆ इ.१२ वीचा निकाल जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि इ. १०वीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील.कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले

◆ विद्यार्थ्यांचे आरोग्य,सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक,पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला आहे, असे गायकवाड यांनी सांगितले आहे.

◆ दहावी,बारावीच्या आऊट ऑफ टर्न परीक्षार्थींसाठी प्रात्यक्षिक,श्रेणी व तोंडी,अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तसेच बारावीसाठी माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान ऑनलाईन परीक्षा आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाच्या (१०वी) परीक्षांचा तपशील असा
➖➖➖➖➖➖➖➖
*😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा_* 👉 https://lokmajha.com
➖➖➖➖➖➖➖➖
*जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close